फ्रिज सतत चालू ठेवावा का? फिरायला जाताना फ्रिजची काळजी कशी घ्यायची

आपण गावाला जाताना किंवा 15 दिवसांच्या सुट्टीवर जाताना घरातील फ्रीज बंद करुन जातो. पण खरंच फ्रीज बंद करुन जाणे योग्य आहे का? हे आज जाणून घेऊया.

| Aug 19, 2024, 11:01 AM IST

आपण गावाला जाताना किंवा 15 दिवसांच्या सुट्टीवर जाताना घरातील फ्रीज बंद करुन जातो. पण खरंच फ्रीज बंद करुन जाणे योग्य आहे का? हे आज जाणून घेऊया.

1/8

फ्रिज सतत चालू ठेवावा का? फिरायला जाताना फ्रिजची काळजी कशी घ्यायची

Why won't the fridge turn off here is the reason

आजच्या काळात फ्रीज हा अविभाज्य घटक बनसा आहे. घरातील उरलेले अन्न फ्रीज मध्ये ठेवले जाते. त्याचबरोबर एकाचवेळी जास्त अन्न बनवून गरजेच्या दिवशी ते गरम करुन पुन्हा खाल्ले जाते. पण फ्रीज सतत चालु ठेवावा का असा प्रश्न प्रत्येकाला पडतो? त्याबद्दलच जाणून घेऊया. 

2/8

फ्रीजचे तापमान

Why won't the fridge turn off here is the reason

आपल्या वापरात असलेला फ्रीज व्यवस्थित काम करतोय का? हे तपासायला हवे. डीप फ्रीजचे तापमान ऋतुमानाप्रमाणे उणे 14 ते उणे 20 डिग्री सेल्सिअस असावं. तर नॉर्मल फ्रीजचे तापमान 4-5 डिग्री असायला हवं. 

3/8

Why won't the fridge turn off here is the reason

लाइट गेल्यावर फ्रीज जास्त वेळा उघड-बंद करु नका. त्यामुळं आतील तापमान जास्त वाढते. त्यामुळं अन्न खराब होण्याचा धोका निर्माण होतो. तसंच, पदार्थांमध्ये जिवाणूही तयार होऊ शकतात. 

4/8

Why won't the fridge turn off here is the reason

अनेकांना असं वाटतं की अधूनमधून फ्रीज बंद केल्याने वीजेचे बचत होते, मात्र हा समज खोटा आहे. 

5/8

Why won't the fridge turn off here is the reason

फ्रीज सतत सुरू ठेवायला काहीच हरकत नाही. कारण फ्रीज बंद करुन सुरू केला की कॉम्प्रेसर सुरु व्हायला जास्त वीज लागते.

6/8

Why won't the fridge turn off here is the reason

 तुम्ही जर दोन दिवस बाहेर जाणार असाल तर फ्रीज बंद करायची गरज नाहीये. 

7/8

Why won't the fridge turn off here is the reason

पण जर तुम्ही महिनाभर बाहेर जाणार असाल तर फ्रीज पूर्ण रिकामा करुन स्वच्छ पुसून घ्या. फ्रीजमध्ये अन्नाचे कण सांडले असतील तर त्यामुळं बुरशी येऊ शकते. फ्रीजच्या दाराचे रबरही स्पंजच्या सहाय्याने स्वच्छ पुसून घ्या. 

8/8

Why won't the fridge turn off here is the reason

 तसंच फ्रीज दीर्घकाळानंतर सुरू केल्यास दोन ते अडीच तास त्यात काहीच वस्तू ठेवू नये. दोन तासांनंतर त्यात सामान ठेवावे.