श्रमिक स्पेशल रेल्वे प्रवासावेळीच महिलेला प्रसूतकळा सुरु झाल्या आणि....

May 28, 2020, 11:23 AM IST
1/6

महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून मदतीचा हात

देशभरात सुरु असणाऱ्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आणि बहुतांश सेवा ठप्प झाल्या. अगदी भारतीय रेल्वेचाही यात समावेश असल्याचं पाहायला मिळालं. रेल्वेचं हे लॉकडाऊन अखेर श्रमिकांना त्यांच्या मुळ गावी पोहोचवण्याच्या कारणास्तव शिथिल करण्यात आलं. ज्यामुळं श्रमिक रेल्वेनं हजारो मजुरांनी त्यांच्या गावाची वाट धरली.   

2/6

महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून मदतीचा हात

अशातच, चंदीगढ येथे श्रमिक रेल्वे सेवेने प्रवास करण्यासाठी म्हणून आलेल्या एका गर्भवती महिलेने रेल्वे स्थानकावर बाळाला जन्म दिला.   

3/6

महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून मदतीचा हात

बुधावारी उत्तरप्रदेशातील जौनपूरसाठी रवाना होणाऱ्या रेल्वेने प्रवास करण्यासाठी वीणा नामक महिला पवन या तिच्या पतीसमवेत चंदीगढ येथे आली होती. सुल्तानपूर या ठिकाणी या दाम्पत्याला पोहोचायचं होतं.   

4/6

महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून मदतीचा हात

रेल्वे स्थानकावर आलं असताच गर्भवती वीणाला प्रसूतकळा सुरु झाल्या. त्याचवेळी रेल्वे स्थानकावर उपस्थित जीआरपी सबइन्स्पेक्टर उर्मिला यादव आणि आरपीएसएफ एएसआय संजीव नेहरा यांनी वीणाची मदत केली. 

5/6

महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून मदतीचा हात

रेल्वे स्थानकावर उपस्थित इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या साथीने या महिलेला रेल्वे स्थनकाबाहेर आणत नजीकच्या मनीमाजरा येथील रुग्णालयात नेलं. त्याच ठिकाणी या महिलेने बाळाला जन्म दिला. 

6/6

महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून मदतीचा हात

डॉक्टरांच्या माहितीनुसार बाळ आणि आई या दोघांचीही प्रकृती उत्तम असून, वीणाचा पती, पवन याने रेल्वे पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.