पृथ्वीचं नेमकं वय काय? World Earth Day ला जाणून घ्या 10 इंटरेस्टिंग फॅक्ट्स
World Earth Day 2024 : दरवर्षी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिन साजरा केला जातो. झपाट्याने बदलणारी जीवनशैली आणि महत्त्वाकांक्षा यामुळे आपण निसर्गाची झपाट्याने हानी करत आहोत. त्याचे परिणाम ग्लोबल वार्मिंग, भूकंप, दुष्काळ आणि इतर प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या रूपातही आपण भोगत आहोत. आपल्या काही सवयी बदलून आपण पृथ्वीला तिच्या मूळ स्वरूपात परत आणण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकू शकतो. अशावेळी जाणून घेऊया पृथ्वीचे 10 इंटरेस्टिंग फॅक्ट्स .
जगभरात 22 एप्रिल रोजी World Earth Day साजरा केला जातो. आजचा दिवस हा असा आहे जेव्हा प्रत्येकाने आपल्या या पृथ्वीची कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कारण या ग्रहाबद्दल आणि आत्तापर्यंत लाभलेल्या अद्भुत नैसर्गिक संसाधनांबद्दल आभार मानायला हवेत. भविष्यातील पिढ्या त्या संसाधनांचा आनंद घेत राहतील याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो करायला हवेत, याची आठवण करुन देणारा हा दिवास.
पृथ्वी दिन हा आपल्या ग्रहाची अधिक चांगली काळजी घेण्यासाठी आयुष्यभर स्मरण करण्याचा दिवस. अशावेळी आपण हा दिवस साजरा करत असताना पृथ्वी या आपल्या ग्रहाबद्दल ठराविक माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती तिचं नेमकं वय काय?