'झी मराठी'चा हातभार, दुष्काळी भागात टँकरने पाणीपुरवठा

| Jun 10, 2019, 13:07 PM IST
1/4

महाराष्ट्रात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावं लागत आहे. पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करताना मुलं, महिला, वृद्ध दिसत आहे. अशा वेळेस महाराष्ट्राची लाडकी वाहिनी असलेल्या झी मराठीने छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. हिंगोलीमध्ये झी मराठीकडून लोकांसाठी पाण्याचे टँकर पुरवले जात आहे. म्हाळशी गावात हा पाण्याचा टँकर पुरवला जात आहे.

2/4

गेल्या ३५ दिवसापासून येथे पाण्याचे टँकर आलेले नाहीत. असं येथील नागरिक सांगत आहेत. झी मराठीचा टँकर जेव्हा या गावात पोहोचला तेव्हा अनेकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रृ होते. पाण्याची स्थिती किती गंभीर आहे. हे यावरुन लक्षात येईल. 

3/4

हंडाभर पाण्यासाठी रोज ८ किलोमीटर पायी जावून येथील लोकांना पाणी आणावं लागत होतं. झी मराठीकडून आणखी १२ दिवस येथे टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. रोज १० हजार लीटरचा टँकर या गावामध्ये पोहोचणार आहे.  

4/4

राज्यात दुष्काळी स्थिती गंभीर असताना झी मराठीने त्यांच्याकडून हा छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.