पुणे : येथे परदेशी तरूणीवर सामूहिक बलात्कारची घटना घडली आहे. पीडित तरूणी मुळची युगांडाची आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. पुण्यातील लोहगाव भागात २८ वर्षीय तरूणीवर दोन जणांनी सामूहिक केला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू आहे. दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पीडित तरूणीचा साड्या निर्यातीचा व्यवसाय आहे. पीडित तरूणी काल रात्री हॉटेलमध्ये गेली होती. परंतु घरी परतण्यासाठी कॅबची वाट पाहत असताना, दुचाकीवरून आलेल्या एका इसमानं तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीवर बसवलं.
त्यानंतर, त्याने त्याच्या मित्राला लोहगाव येथील मैदानावर बोलावले. नंतर दोघांनी तरूणीवर एका निर्जन स्थळी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. घटल्याप्रकारानंतर पीडित तरूणीने आरोपींना 'मला आता किमान रस्त्यावर तरी सोडा अशी विनवणी केली.'
त्यानंतर त्यांनी तिला रस्तावर सोडलं आणि आरोपी फरार झाले. पीडित तरूणीला घाबरलेल्या अवस्थेत आसपासच्या नागरिकांनी पाहिल्यानंतर तिला पोलीस स्थानकात सोडले. त्यानंतर घडलेला प्रकार समोर आला. या प्रकरणी दोन्ही आरोपींचा शोध विमानतळ पोलीस घेत आहेत.