अनैतिक संबध आणि वादातून विवाहित तरुणीची हत्या; लॉजवरील घटनेने खळबळ

अनैतिक संबंधातून विवाहित तरुणीचा चाकूने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील एका लॉजमध्ये घडली. करुणा राधाकिसन काटमोरे (वय 23, रा. कात्रज) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

Updated: Jul 12, 2022, 09:41 AM IST
अनैतिक संबध आणि वादातून विवाहित तरुणीची हत्या; लॉजवरील घटनेने खळबळ title=

पुणे : अनैतिक संबंधातून विवाहित तरुणीचा चाकूने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील एका लॉजमध्ये घडली. करुणा राधाकिसन काटमोरे (वय 23, रा. कात्रज) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी भोर येथून सचिन राजू शिंदे (वय 30, रा. वारजे) याला अटक केली आहे. शिंदे हा तरुणीचा खून केल्यानंतर तेथून फरार झाला होता. ही घटना रविवारी (ता.10) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली आहे.  याबाबत रात्री उशीरापर्यंत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबधित तरुणी करुणा विवाहित असून तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. तिचा पती एका हॉटेलमध्ये काम करतो. आरोपी सचिनशी तिची काही महिन्यांपूर्वी एका कंपनीत काम करत असताना ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते. रविवारी (10 जुलै) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोघेजण पुणे-सातारा रस्त्यावरील शीतल लॉजमध्ये आले होते. 

सचिन हा करुणावर संशय घेत होता. त्यावरून दोघांत वाद झाले. त्यावेळी त्याने करुणाच्या गळ्यावर चाकुने वार केले. त्यानंतर तो पसार झाला होता. लॉजमधील कामगार साफसफाई करण्यासाठी आला. तेव्हा करुणा मृतावस्थेत पडलेली त्याला दिसून आली. त्याने या घटनेची माहिती हॉटेल व्यवस्थापनाला दिली.

घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना कळविण्यात आली. . पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास पथकाला आरोपीचा माग काढण्याच्या सुचना दिल्या. तसेच दुसर्‍या पथकाला तरुणीची ओळख पटविण्यास सांगितले होते. 

तरुणीची ओळख पटल्यानंतर आरोपीला पोलिसांनी भोर येथून  ताब्यात घेतले. पुढील चौकशीत आरोपीने खुनाची कबूली दिली.