पुणे : रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या हेल्पलाईनसाठी ठेवलेल्या मोबाईल क्रमांकावर अश्लिल फोटो, मॅसेज पाठवणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीने रुग्णालयातील 4 महिला डॉक्टरांचा विनंयभंग केल्याची तक्रार पुणे सायबर पोलिसांत दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
आंध्रप्रदेशात राहणाऱ्या तिरुपतीराव गुम्मादीवर आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी पुणे पोलिसांकडे तक्रार दिली की, 2018 मध्ये ढोले पाटील रस्त्यावरील रुग्णालयात आरोपी उपचार घेण्यासाठी आला होता. उपचारानंतर आरोग्याविषयी फॉलोअपसाठी रुग्णांना रुग्णालयाचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा क्रमांक महिला डॉक्टर वापरत असे.
महिला डॉक्टर वापरत असलेल्या रुग्णालयाच्या फोनवर आरोपीने 2018 ते जानेवारी 2022 पर्यंत अश्लिल मॅसेज, फोटो, व्हिडीओ पाठवले. एक नव्हे तर चार महिला डॉक्टरांच्या मोबाईलवर आरोपीने असे मॅसेज आणि फोटो पाठवले. यामुळे 29 वर्षीय महिला डॉक्टरांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. संबधितावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.