कोविड सेंटरमध्ये घुसून डॉक्टरांसह दोन परिचारिकांना मारहाण; कोरोनायोद्ध्यांची सुरक्षितता वाऱ्यावर

 कोविड सेंटरमध्ये घुसून कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व दोन परिचारिका महिलांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

Updated: May 9, 2021, 12:11 PM IST
कोविड सेंटरमध्ये घुसून डॉक्टरांसह दोन परिचारिकांना मारहाण; कोरोनायोद्ध्यांची सुरक्षितता वाऱ्यावर title=

पुणे :  'तुम्ही आमच्या वडिलांवर व्यवस्थित औषधोपचार करीत नाही', असे म्हणून कोविड सेंटरमध्ये घुसून कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व दोन परिचारिका महिलांना मारहाण झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर  येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये शनिवारी घडलीय.यातील डॉक्टर व परिचारकांस मारहाण  करणाऱ्या सुनील चंद्रकांत रणखांबे, रवी चंद्रकांत रणखांबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . 

 डॉक्टर श्वेता संभाजी कोडग या उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर सेवा करीत असताना, रुग्ण चंद्रकांत चन्नाप्पा रणखांबेचे नातेवाईक सुनील व रवी रणखांबे यांनी कोविडच्या वार्ड ३ मध्ये जबरदस्ती प्रवेश केला. तुम्ही माझ्या वडिलांवर व्यवस्थित उपचार औषध उपचार करीत नाही म्हणून डॉक्टर  कोडग यांचा हात पिळुन डाव्या गालावर चापट मारली.  

तसेच परिचारिका अंजली बिभीषण पवार व सोमय्या सत्तार बागवान यांना देखील हाताने मारहाण केली. यात पवार यांना अधिक दुखापत झाली आहे.  

 अहोरात्र कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा व आरोग्य सेविकांचा सुरक्षिततेचा प्रश्न उपलब्ध झाला असल्याच मत इंदापूर येथील वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर एकनाथ चंदनशिवे यांनी सांगितलेय .