1/7
खेळण्यातील हजारो बंदुका नष्ट करण्यात आल्या.
प्रत्येक १० पैकी ३ अपराध हे खऱ्या सारख्या दिसणाऱ्या खोट्या बंदुकांद्वारे केले जातात, असा दावा केला मॅक्सिको सिटीच्या अधिकाऱ्यांनी.... या वर्षी जानेवारी महिन्यात नकली बंदुकांद्वारे होणाऱ्या गुन्हांना रोखण्यासाठी खेळण्यातील हजारो बंदुका नष्ट करण्यात आल्या.खेळण्यातील बंदुका या पारदर्शी आणि भडक रंगानी बनविण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहे.
2/7
७२ वर्षांपासून हरवलेल्या बहिणी फेसबूकवर भेटल्या
धन्यवाद फेसबूकचे ज्याच्यामुळे बोस्नियाच्या दोन बहिणी ७२ वर्षांनंतर भेटल्या. केवळ २०० किमी अंतरावर राहत असलेल्या ८८ वर्षीय तनीजा देलिक यांनी ८२ वर्षांच्या हदिजा तेलिक यांना १९४१ पासून एकमेकांना पहिले नव्हते. तेव्हा हदिजा तेलिक यांचे वय ११ वर्षांच्या होत्या. दुसऱ्या महायुद्धात पश्चिमोत्तर बोस्नियातील एका गावातून पळताना दोघी विभक्त झाल्या होत्या. पालकांना ठार केल्यानंतर हदिजा अनाथालयात वाढल्या.
3/7
जेथे रोबोट बनवतात जेवण
चीनच्या एका रेस्टॉरंटमध्ये पदार्थ बनविणे आणि वाढण्याचे कामापासून ग्राहकांचे मनोरंज करण्याचे काम रोबोट करतात. या रोबोटला टीप देण्याची गरजही नाही. या रेस्टॉरंटमध्ये १८ प्रकारचे रोबोट आहेत, ज्यात काही स्वयंपाक घऱात तर काही ग्राहकांना सर्विस देतात. रिसेप्शनवर असलेल्या रोबोट ग्राहक आल्यावर हात खुले करत म्हणतात, तुमचे स्वागत.... मुख्य इंजिनिअर लियू हशेंग यांनी दिलेल्या माहितीनुसार रेस्टोरंट तयार करण्यात ५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन तास चार्च केल्यानंतर रोबोट ५ तास काम करू शकतात.
4/7
वाळवीने नष्ट केले ४० लाख रुपये
चीनच्या एका महिलेने आपल्या घरात मोठ्या काळजीने सुमारे ४० लाख रुपये गोळा केले होते. पण तिच्या घरातील वाळवीने सर्व रक्कम नष्ट केली. गुआंगदोंग प्रांताच्या शुंदे शहरात राहणाऱ्या एका महिलेला ही रक्कम तिच्या मुलाने दिली होती. या महिलेने ही रक्कम बँकेत जमा करण्याऐवजी एका प्लास्टिक बॅगेत ठेऊन एका लाकडाच्या कपाटात ठेवली. सहा महिने हे कपाट तिने पाहिले नाही. या वर्षी एप्रिलमध्ये तिने कपाट उघडले असता खूप उशीर झाला होता. वाळवीने एक नोट सोडली नाही. संपूर्ण रक्कम नष्ट केली.
5/7
निवडणुकीची तयारीच विसरले उमेदवार
तुमचा या बातमीवर विश्वास नाही बसणार पण अमेरिकेच्या छोट्या पर्वतीय शहर वासाच काउंटी ५ नोव्हेंबरला महापौर आणि नगर परिषदेच्या ४ सदस्यांच्या निवडणूका होऊ शकल्या नाही. अधिकारी आणि उमेदवार या निवडणुकीची प्रचाराची तयारी करणेच विसरले आहे. उटाह येथे वासाच माउंटेन्समध्ये २७५ लोकसंख्या असलेल्या वॉल्सबर्ग येथे दोन वर्षांपूर्वी निवडणुका घेणेच विसरले होते.
6/7