सलमान खानचे वडील सलीम खान आणि अभिनेत्री हेलन यांनी एका मुलीला दत्तक घेतलं होतं... हीच मुलगी म्हणजे अर्पिता खान... अर्पिता नुकतीच आयुष शर्मा याच्यासोबत विवाहबद्ध झालीय.
2/7
प्रसिद्ध डान्स इन्स्ट्रक्टर संदिप सोपरकर यानंही एका मुलाला दत्तक घेतलंय. 2007 सालापासून त्यानं आपल्या मुलाला 'अर्जुन'ला एकट्यानंच वाढवलं... त्यानंतर त्यानं गर्लफ्रेंज जेसी रंधवा हिच्यासोबत विवाह केला.
3/7
सिनेनिर्माता आणि 'कॉफी विथ करन' या कार्यक्रमाचा निर्माता कुणाल कोहली यानंही एका चिमुकलीला दत्तक घेतलंय. 'राधा' असं त्यानं आपल्या या दत्तक मुलीचं नामकरण केलंय.
4/7
अभिनेत्री प्रिती झिंटा हिनं 34 मुलींना 2009 साली दत्तक घेतलं. रिषिकेशच्या मदर मिरॅकल शाळेतील या मुली आहेत. या मुलींचा जेवणाचा, राहण्याचा, शिक्षणाचा असा सगळा खर्च प्रितीनं आपल्या कणखर खांद्यावर उचललाय.
5/7
सुष्मिता सेन हिनं भली मोठी कायदेशीर लढाई लढून रीना या मुलीला दत्तक घेतलं... त्यानंतर तिनं आणखी एका मुलीला दत्तक घेतलं... अलिसाह असं या मुलीचं नाव... या दोन्ही मुली अनेकदा सुष्मितासोबत दिसतात.
6/7
काही वर्षांपूर्वी कचऱ्याच्या कुंडीत सापडलेल्या एका चिमुकलीला मिथून चक्रवर्ती यांनी दत्तक घेतलं... इशानी असं तिचं नाव... इशानी आता मोठी झालीय.
7/7
दिग्दर्शक सुभाष घई यांनी एका मुलीला दत्तक घेतलं होतं... मेघना असं तिचं नाव... मेघनानं आपलं उच्चशिक्षण लंडनमध्ये पूर्ण केलंय. सध्या तीनं 'व्हिसलिंग वूड' नावाच्या प्रोडक्शन स्कूलवर आपलं लक्ष केंद्रीत केलंय.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link