मुंबई : नवे वर्ष सुरु झालेय. प्रत्येक वर्ष प्रत्येक व्यक्तीसाठी खास काही घेऊन येते. काहींसाठी नवे वर्ष खूप आनंद घेऊन येते तर काहींसाठी संघर्षमय अशते. चीनी राशिंनुसार २०१८ हे वर्ष कुत्रा या राशींसाठी खूप चांगले जाणार आहे. चीनी राशी या प्राण्यांच्या नावावर असतात. असं म्हटलं जात की जे वर्ष ज्या चीनी राशीचे असते ते वर्ष त्या राशीच्या व्यक्तीसाठी यशदायी आणि आनंदाने भरलेले असते.
उंदीर(rat) - 1948, 1960, 1972, 1984, 1996, 2008 या वर्षात जन्मलेल्या व्यक्तींची रास उंदीर ही असते.२०१८ हे वर्ष या राशीच्या व्यक्तींसाठी साधारण असेल. या राशीच्या व्यक्ती या वर्षी आरामाला प्राथमिकता देतील. त्यासाठी त्यांना नुकसानही सहन करावे लागणार नाही. २०१७मध्ये भरपूर मेहनत घेतल्यानंतर या राशीच्या व्यक्तींसाठी आराम गरजेचा आहे.
म्हैस(Ox,Buffalo) : 1949, 1961, 1973, 1985, 1997, 2009 या वर्षी जन्मलेल्या व्यक्तींची रास म्हैस असते. हे नवे वर्ष या राशींसाठी आव्हानात्मक असणार आहे. त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा असेल. लग्न झालेल्यांनी आपल्या रागारव नियंत्रण ठेवावे. धैर्य ठेवावे. पूर्ण वर्षाचे बोलायचे झाल्यास त्यांच्यासाठी हे वर्ष चांगले जाईल.
वाघ(tiger) : 1950, 1962, 1974, 1986, 1998, 2010 य़ा वर्षात जन्मलेल्या व्यक्तींची रास वाघ असते. वाघ राशींच्या व्यक्तींसाठी हे वर्ष उत्तम जाणार आहे. यांच्यासमोर समस्या जरी आल्या तरी ते आरामात याचा सामना करतील आणि वर्ष चांगले घालवतील.
ससा(Rabbit): 1951, 1963, 1975, 1987, 1999, 2011 यावर्षात जन्मलेल्या व्यक्तींची रास ससा आहे. हे वर्ष ससा राशीच्या व्यक्तींसाठी खूप चांगले जाणार आहे. प्रेम असो व्यापार या राशीच्या व्यक्ती सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करतील.
ड्रॅगन (dragon) : 1952, 1964, 1976,1988, 2000, 2012 या वर्षात जन्मलेल्या व्यक्तींची रास ड्रॅगन असते. ड्रॅगन शक्ती आणि ताकदीचे प्रतीक मानले जाते. मात्र यंदाच्या वर्षात या राशीच्या लोकांनी जपून राहावे. त्यांच्यासाठी नवे वर्ष आपल्या आयुष्याला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी चांगली संधी आहे.
साप(Snake) : 1953, 1965, 1977, 1989, 2001, 2013 या वर्षात जन्मलेल्या व्यक्तींची रास साप असते. या राशींच्या लोकांसाठी हे वर्ष कठोर असणार आहे. त्यामुळे कोणतेही पाऊल विचारपूर्वक ठेवावे.
घोडा (horse) :1954, 1966, 1978, 1990, 2002, 2014 य़ा वर्षात जन्मलेल्या व्यक्तींची रास घोडा असते. नव्या वर्षात या राशीच्या व्यक्ती कुटुंबावर अधिक लक्ष केंद्रित करतील. प्रेमात ब्रेकअप होण्याची शक्यता अधिक आहे.
बकरी(goat) : 1955, 1967, 1979, 1991, 2003, 2015 य़ा वर्षात जन्मलेल्या व्यक्तींची रास बकरी ही आहे. नव्या वर्षात या राशीच्या व्यक्ती स्वत:चे महत्त्व ओळखतील आणि स्वत:वर अधिक लक्ष केंद्रित करतील. नेहमी दुसऱ्यांच्या गरजांकडे लक्ष देणाऱ्या या राशीच्या व्यक्ती आता स्वत:वर लक्ष देतील.
माकड(monkey) : 1944, 1956, 1968, 1980, 1992, 2004 या वर्षात जन्मलेल्या व्यक्तींची रास माकड असते. २०१८ या वर्षात माकड राशीच्या व्यक्ती गेल्या वर्षी केलेल्या चुका स्वीकारतील. यातून ते धडा घेत पुढे जातील.
कोंबडा(rooster) : 1945, 1957, 1969, 1981, 1993, 2005 य़ा वर्षात जन्मलेल्या व्यक्तींची रास कोंबडा असते. यांच्यासाठी हे वर्ष आनंददायी असणार आहे. नव्या व्यापाऱाची सुरुवात करु शतात. नवे विचार आणि उत्साहाने केलेल्या कामाची चांगली पावती मिळेल.
कुत्रा( dog) : 1946, 1958, 1970, 1982, 1994, 2006, 2018 या वर्षात जन्मलेल्या व्यक्तींची रास कुत्रा आहे. हे वर्ष या राशीसाठी खूप आनंद घेऊन येणार आहे. कोणतेही हाती घेतलेले काम यांना लाभ मिळवून देईल. इतकंच नव्हे तर नात्यातही त्यांना कोणतीही समस्या जाणवणार नाही.