Neechbhang Rajyog : 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्रमुळे नीचभंग राजयोग! 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल

Neechbhang Rajyog : तब्बल 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्र या ग्रहामुळे नीचभंग राजयोगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 7, 2023, 05:00 AM IST
Neechbhang Rajyog : 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्रमुळे नीचभंग राजयोग! 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल title=
500 years later due to Sun Venus made Nichbhang Rajyoga these 3 zodiac sign will bring wealth suddenly

Neechbhang Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रेम, आनंद, ऐश्वर्याचा कारक शुक्र देव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश केलाय. सध्या शुक्र ग्रह कन्या राशीत विराजमान आहे. शुक्र देव कन्या राशीत तर तूळ राशीत सूर्य असल्यामुळे तब्बल 500 वर्षांनी शुभ असा नीचभंग राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे तीन राशींची दिवाळी खऱ्या अर्थाने मालामाल ठरणार आहे.  कोणत्या राशी भाग्यशाली ठरणार आहेत जाणून घ्या. (500 years later due to Sun Venus made Nichbhang Rajyoga these 3 zodiac sign will bring wealth suddenly)

कन्या (Virgo Zodiac) 

कन्या राशीच्या लोकांसाठी नीचभंग राजयोग अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. शुक्रदेव या लोकांच्या कुंडलीत चढत्या घरात असणार आहे. तर सूर्य तुमच्या धन गृहात फिरणार आहे. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार असून तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. नीचभंग राजयोग हा लव्ह लाइफसाठीही उत्तम असणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac) 

नीचभंग राजयोगमुळे कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीची ठरणार आहे. शुक्र तुमच्या राशीतून तिसऱ्या भावात तर सूर्य देव चौथ्या भावात फिरणार आहे. त्यामुळे धैर्य, शौर्य वाढणार आहे. तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभ होणार आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदीचा शुभ योग आहे. सुख सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढणार आहे. 

मकर (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी नीचभंग राजयोग शुभ सिद्ध ठरणार आहे. शुक्रदेव तुमच्या राशीतून नवव्या भावात तर सूर्य दहाव्या भावात असणार आहे. तुम्हाला या योगामुळे नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरी व्यवसायात घवघवीत यश तुम्हाला मिळणार आहे. या योगामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल. जमीन आणि वाहन खरेदीचे योग आहे. सुख सुविधांमध्ये वाढ होणार आहे. व्यवसायात प्रगती होईल. 

हेसुद्धा वाचा - Shani Asta 2024 : नवीन वर्ष 2024 ची सुरुवात 'या' राशीच्या लोकांसाठी घातक, शनिदेव अस्तामुळे आयुष्यात मोठी उलथापालथ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)