Dasara 2024 : 100 वर्षांनंतर दसऱ्याला षष्ठ आणि मालव्य राजयोग! 'या' लोकांचा सुरु होणार सुवर्णकाळ

Shash And Malavya Rajyog : यंदा दसऱ्याला दोन अतिशय महत्त्वाचे आणि शुभ राजयोग निर्माण होत आहे. शनि आणि शुक्रामुळे शश राजयोग आणि मालव्य राजयोग 3 लोकांचे नशिब सोन्यासारखं चमकणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 7, 2024, 01:58 PM IST
Dasara 2024 : 100 वर्षांनंतर दसऱ्याला षष्ठ आणि मालव्य राजयोग! 'या' लोकांचा सुरु होणार सुवर्णकाळ  title=
After 100 Years Dasara or Dussehra Shash And Malavya Rajyog these Zodiac Sign people will begin golden Time

Dasara 2024 Lucky Zodiac Sign : दसरा म्हणजे विजयादशमी हा आश्विन शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला साजरा करण्यात येतो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा शुभ दिवस भारतात मोठ्या थाट्यामाटात साजरा करण्यात येतो. यंदा दसरा येत्या शनिवारी 12 ऑक्टोबरला असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदा दोन अतिशय शुभ आणि महत्त्वाचे योग जुळून आले आहेत. दसऱ्याला शुक्र तूळ राशीमध्ये स्थित असल्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. तर शनिदेवही या दिवशी स्वतःच्या कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे. अशा स्थितीत या दोन राजयोगांचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडणार आहे. पण 3 राशीच्या लोकांचं नशीब यावेळी चमकू चमकणार असून करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार आहे.  (After 100 Years Dasara or Dussehra Shash And Malavya Rajyog these Zodiac Sign people will begin golden Time)

मकर (Capricorn Zodiac)   

शश आणि मालव्य राजयोग या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. कारण शनिदेव तुमच्या राशीतून धनाच्या घरात भ्रमण करत आहे. तर शुक्र कर्माच्या घरात आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. तसंच, यावेळी तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रगती पाहिला मिळणार आहे. तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी यश प्राप्त होणार आहे. व्यावसायिक लोक नफा मिळवू शकतात ज्यामुळे त्यांना खूप समाधान मिळणार आहे. 

तूळ (Libra Zodiac)  

शश आणि मालव्य राजयोग या लोकांचं आयुष्य बदलणार आहे. कारण शनि तुमच्या राशीतून पाचव्या भावात तर शुक्र तुमच्या कुंडलीच्या चढत्या भावात आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. तुमचे व्यक्तिमत्वही सुधारणार आहे. यावेळी, आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होणार असून कर्जापासून मुक्तता मिळणार आहे. जर तुम्ही नवीन नोकरीची योजना आखत असाल तर यावेळी तुमच्या आवडीची नोकरी तुम्हाला मिळणार आहे. दुसरीकडे, जर तुमचे प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळणार आहे. यावेळी, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. 

 

हेसुद्धा वाचा - Dussehra 2024 : यंदा विजयादशमीला अशुभ संकेत; चुकूनही करू नका 'हे' काम

 

वृषभ (Taurus Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोगाची वरदान ठरणार आहे. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून सहाव्या स्थानात तर शनी कर्म घरातून भ्रमण करत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळणार आहे. तसंच यावेळी बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार आहे. यावेळी, तुम्ही तुमच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड यशाची अपेक्षा करू शकता. लोकांचे धैर्य आणि शौर्य वाढेल ज्यामुळे ते अनेक क्षेत्रात यश मिळवू शकतील. तसंच या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)