Saturn Transit 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह राशीबदलासोबबत वक्री आणि मार्गस्थ देखील होतात. कर्माची देवता शनिदेव येत्या काळात वक्री स्थितीत जाणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसणार आहे.
ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनिदेव 29 जून रोजी सकाळी 12:35 वाजता कुंभ राशीत वक्री होणार आहेत. तर, 15 नोव्हेंबरपासून शनी सरळ चाल चालणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर सकारात्मक किंवा नकारात्मक स्वरूपात दिसून येणार आहे. ज्योतिष शास्त्रात कोणत्या राशींवर शनीच्या उलट्या गतीचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे, हे पाहूया.
ज्योतिषशास्त्रानुसार शनीची वक्री चाल मेष राशीसाठी सकारात्मक फायदेशीर ठरणार आहे. हे लोक व्यवसायाशी संबंधित असतील तर त्यात प्रगती होते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. शनीच्या विशेष कृपेने या राशीच्या लोकांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.
ज्योतिष शास्त्रानुसार शनीची वक्री चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी या राशींच्या त्यांच्या करिअरमध्ये वाढ होणार आहे. धार्मिक कार्यात रुची वाढू शकते. नोकऱ्यांची तयारी करत आहेत त्यांना नोकरी मिळेल. अनपेक्षित आर्थिक लाभही होऊ शकतो.
ज्योतिष शास्त्रानुसार शनीची वक्री चाल त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसायात नफा मिळू शकतो. जीवनातून सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील. या लोकांच्या आरोग्याशी संबंधित समस्याही दूर होतील. एवढेच नाही तर त्यांची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )