मुंबई : आपल्या दिवसाची सुरूवात सुर्योदय आणि संध्याकाळची सुरूवात सूर्यास्तानंतर होते. जर तुमच्या घरात वृद्ध व्यक्ती असतील तर ते सांगतात की सूर्यास्तानंतर काही कामे बिलकूल करू नका. त्यांच्या बोलण्यामागे काही कारणं असतात. सूर्यास्तानंतर काही कामे करणं अशुभ मानलं जातं. आपल्या रोजच्या जीवनातील अशी 5 कामे आहेत जी सूर्यास्तानंतर करू नये. शिवाय या 5 कामांची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
तुळशीचं झाडं प्रत्येकाच्या घरात असतं. घरात तुळस असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पण शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करू नये. त्याचप्रमाणे संध्याकाळी तुळशीला पणी देखील घालू नये. असं केल्यास लक्ष्मी नाराज होते आणि समृद्धी दूर होते.
हिंदू धर्मात दान करण्याला फार महत्त्व असतं. पण सूर्यास्तानंतर कधीही दहीचं दान करू नका. दह्याचा शुक्र ग्रहासोबत संबंध असतो. सूर्यास्तानंतर दही दान केल्यामुळे सुखः आणि समृद्धी दूर होते. त्यामुळे सूर्यास्तानंतर कधीही दही दान करू नका.
आताच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाचं वेळापत्रक फार व्यस्त असतं, पण असं असलं तरीही सूर्यास्तानंतर झोपू नका. शिवाय सूर्यास्तानंतर जेवण देखील करू नसे. यामुळे धन लाभ होत नाही. शिवाय आरोग्य देखील बिघडतं.
सूर्यास्तानंतर घराची साफ-सफाई बिलकूल करू नये. सूर्यास्तानंतर केर काढल्यास किंवा फर्शी पुसल्यास घरातील आनंदाला ग्रहण लागतं. सूर्यास्तानंतर तुम्ही वाचू शकता, खेळू शकता. व्यायम करू शकता. पण साफ-सफाई बिलकूल करू नये.
सूर्यास्तानंतर कधीही केस कापू नका. सूर्यास्तानंतर केस कापल्यास किंवा शेविंग केल्यास त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. धन लाभ होत नाही. म्हणून सूर्यास्ता पूर्वी केस कापा किंवा शेव करा.