पहाटे ब्रम्हमुहूर्तावर तुम्हाला 'हे' 10 स्वप्न पडले तर समजा तुमची लॉटरीच लागली......

तुमच्या स्वप्नांचा अर्थ काय? कोणते स्वप्न तुम्हाला मालामाल बनवू शकतात?

Updated: Jun 16, 2021, 01:22 PM IST
पहाटे ब्रम्हमुहूर्तावर तुम्हाला 'हे' 10 स्वप्न पडले तर समजा तुमची लॉटरीच लागली...... title=

मुंबई : तुमच्या सोबत असे बऱ्याचदा झाले असेल की, तुम्हीचे विचार मनात करतात तेच कधी कधी तुमच्या स्वप्नात येतात, तर काही वेळा तुम्हाला पडलेली स्वप्न बऱ्याचगदा भविष्यात होणाऱ्या गोष्टींचे संकेत देतात. बऱ्याचदा आपल्याला असे ही स्वप्न पडतात ज्याचा अर्थ आपल्याला माहित नसतो. कधी कधी मला असे स्पप्न का पडलं याचा अर्थ काय हे आपण शोधत असतो. परंतु प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो आणि यासंबंधीचे शास्त्र लिहून ठेवलेले आहे, जे आपल्या स्वप्नांचा अर्थ सांगतो. शास्त्रानुसार, सकाळी 3 ते 5 वाजेदरम्यान पाहिलेले स्वप्न खरे होतात. कारण यावेळी स्वप्नांवर दैवी शक्तींचा परिणाम होत असतो.

चला तर जाणून घेऊया तुमच्या स्वप्नांचा अर्थ काय? कोणते स्वप्न तुम्हाला मालामाल बनवू शकतात?

1. जर स्वप्नात तुम्ही एखाद्या व्यक्तीला धान्य देत असाल आणि त्याचवेळी तुम्हाला जाग आली तर समजा तुम्हाला धनलाभ होणार आहे.
2. स्वप्नात एखादं लहान बाळ मस्ती करताना दिसलं म्हणजे धनलाभाचा इशारा आहे.
3. जर तुम्हाला स्वप्नात एखादा पाण्याने भरलेला घडा दिसला किंवा मोठ्या पात्रात पाणी भरलेले दिसले, तर निश्चितच तुम्हाला धनलाभ होतो. त्याचबरोबर मातीचा घडा दिसला तर ते सर्वश्रेष्ठ असते. अशा व्यक्तीला धनलाभासोबतच जमीनीच्या व्यवहारात लाभ होतो.
4. स्वप्नात स्वत:ला किंवा दुसऱ्या व्यक्तीला अंघोळ करताना पाहणे हे शुभ असते. हे स्वप्न जर तुम्हाला प्रवासादरम्यान पडले, तर तुम्हाला त्या यात्रेपासून धनलाभ होण्याचे संकेत असते.
5. गंगा नदीत स्नान करतानाचे स्वप्न पाहणे खूप शुभ असते. यामुळे कुठेतरी अडकलेला पैसा किंवा दिलेली उधारी तुम्हाला लवकरच मिळू शकते.
6. स्वप्नात जर तुमचा दात तुटला, तर लवकरच धनप्राप्ती होते. तुम्हाला नोकरी-व्यवसायात लाभ मिळण्याचे संकेत असते.
7. स्वप्नात कोणाचा खून होताना पाहिलं तर धनलाभ होतो. यामुळे अडकलेला पैसाही परत मिळण्याची शक्यता आहे.
8. स्वप्नात तुम्ही नोकरीची मुलाखत देत असाल, तर लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचा होण्याची शक्यता आहे.
9. स्वप्नात दिवंगत पूर्वजांना पाहणे धनलाभेचं संकेत असते.
10. जर एखादे मंदिर, शंख, गुरू, शिवलिंग, ज्योत, घंटा, द्वार, राजा, रथ, पालखी, आकाश आणि पौर्णिमेचा चंद्र दिसला, तर या गोष्टी धर्म-पुराणात शुभ मानल्या जाते. यासंबंधीच्या बऱ्याच कथाही लोकप्रिय आहे.