Sun Transit: तीन दिवसानंतर सूर्य करणार तूळ राशीत प्रवेश, या राशीच्या लोकांनी जरा सांभाळूनच

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. सूर्य देवाच्या राशी परिवर्तनाचा 12 राशींवर प्रभाव पडतो. आता तीन दिवसांनी म्हणजेच 17 ऑक्टोबर सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत प्रवेश करताच प्रभाव कमी होईल.

Updated: Oct 14, 2022, 01:16 PM IST
Sun Transit: तीन दिवसानंतर सूर्य करणार तूळ राशीत प्रवेश, या राशीच्या लोकांनी जरा सांभाळूनच title=

Sun Transit 2022 In Tula Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. सूर्य देवाच्या राशी परिवर्तनाचा 12 राशींवर प्रभाव पडतो. आता तीन दिवसांनी म्हणजेच 17 ऑक्टोबर सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत प्रवेश करताच प्रभाव कमी होईल. वृश्चिक आणि लग्न राशीच्या लोकांवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊयात. सूर्य परिवर्तनामुळे वृश्चिक राशीसाठी हा काळ अनुकूल नसेल. वाईट स्वभावाची लोकं त्रास देण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत विवेक वापरा आणि कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवू नका. या काळात तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे खर्च करू नका.

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करण्याची सवय सोडा. जास्त विचार केल्याने मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. ऑफिसमधील कामाच्या ताण वाढेल. त्यामुळे चिडचिड होईल. पण आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप घ्या. या काळात डोळ्याशी संबंधित त्रास होऊ शकतो. डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करा. आर्थिक व इतर समस्यांमुळे स्वभाव चिडचिडा, पण मन शांत ठेवा. तुमच्या अशा वागण्यामुळे मित्र आणि नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

Guru Margi 2022: दिवाळीनंतर गुरू ग्रह होणार मार्गस्थ, या राशींना मिळणार नशिबाची साथ

व्यवसायाच्या दृष्टीकोनातून हा काळ अनुकूल नाही. कोणताही नवीन करार करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचण या काळात वाढू शकते. त्यामुळे स्थिती लक्षात घेऊनच पावलं उचला. अशा परिस्थितीत तुम्हाला संयम ठेवावा लागेल. ग्रहांच्या स्थिती पाहता काही ठिकाणी अपमान होईल, मित्रांशी वाद होईल.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)