Auspicious Yoga On Diwali : दीपावली किंवा दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. प्रकाशाचा हा सण मोठ्या थाट्यामाट्या साजरा होतो. नकारात्मक भावनांवर सकारात्मकने विजय मिळवण्याचा हा उत्साह. यंदाची दिवाळी ही वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अतिशय खास आहे. जवळपास 500 वर्षांनंतर दिवाळीत अनेक शुभ संयोग निर्माण होतं आहेत.
या दिवाळीत शनि ग्रह कुंभ राशीच्या मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे शश राजयोग निर्माण झाला आहे. तर सूर्य आणि चंद्र तूळ राशीत असून 16 आणि 17 नोव्हेंबर महिन्यात रुचक आणि युक्त योग निर्माण झाला आहे. तर पंचांगानुसार दिवाळीत आयुष्मान आणि सौभाग्य योग असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार असा योगायोग तब्बल 500 वर्षांनी निर्माण होतो आहे. त्यामुळे हा योग काही राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. या लोकांची दिवाळी खऱ्या अर्थाने धनवान आणि सुख समृद्धीने संपन्न होणार आहे.
दिवाळीतील शुभ योग अतिशय लाभदायक ठरणार आहे. तुमच्या राशीत गुरु ग्रह असल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत वाढणार आहे. त्याशिवाय उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुम्हाला गवसणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ शुभ असून तुम्हाला दुप्पटीने फायदा होईल. अगदी नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळणार आहे. वैवाहिक जीवनात किंवा लव्ह लाइफमध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे.
या राशीच्या लोकांनाही या योगाचा उत्तम लाभ मिळणार आहे. दिवाळीतील या अद्भूत योदामुळे तुमचं आयुष्या सकारात्मक गोष्टीने परीपूर्ण होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती या काळात मजबूत स्थिती येणार असून रखडलेली कामं पूर्णत्वाला जाणार आहे. कायदेशीर बाबींमध्ये यश तुमच्यासोबत असेल. वाहन, मालमत्ता आणि घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तरदुसरीकडे समाजात मान सन्मान वाढविणारा ठरणार आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी यश प्राप्त होईल.
शनिदेव स्वगृही असल्याने अनेक शुभ योग निर्माण होत आहे. याचा सर्वाधिक लाभ मकर राशीच्या लोकांना होणार आहे. भविष्यात मोठे निर्णय तुमच्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारे ठरणार आहे. करिअरच्या बद्दल बोलायचं झालं तर प्रगती आणि यश तुमची वाट पाहत आहेत. तुमच्या वर मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. तुमच्या कामावर वरिष्ठ आनंदी असणार असून तुमचं कौतुक करणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)