Ganesh Jayanti 2024 : माघी गणेश जयंतीला अंगारक व साध्य योग! 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा

Ganesh Jayanti 2024 : माघी गणेश जंयतीला रवियोग, साध्यसह अंगारक योग जुळून आला आहे. माघी गणेश जयंती काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Feb 13, 2024, 08:37 AM IST
Ganesh Jayanti 2024 : माघी गणेश जयंतीला अंगारक व साध्य योग! 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा title=
Angarak and Sadhya Yoga on Maghi Ganesh Jayanti Bappa s grace will be showered on these zodiac signs

Ganesh Jayanti 2024 : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी करण्यात येत आहे. आज गणेश अंगारकीला सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, साध्य योग, शुभ योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे माघी गणेश जयंती काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी संबंध मजबूत होणार आहे. (Angarak and Sadhya Yoga on Maghi Ganesh Jayanti Bappa s grace will be showered on  these zodiac signs)

वृषभ रास (Taurus Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी माघी गणेश जयंती शुभ ठरणार आहे. हनुमानजींच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांच्या आनंदात वाढ होणार आहे. त्यांना धनप्राप्तीचे मार्ग गवसणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होणार आहे. नोकरदार लोकांना आणि व्यावसायिकांना चांगला नफा मिळणार आहे. 

कर्क रास (Cancer Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी माघी गणेश जयंती शुभ आणि फलदायी ठरणार आहे. या राशीचे लोकांच्या इच्छा पूर्ण होणार आहे. त्यांना एखाद्या सामाजिक संस्थेकडून पुरस्कारही प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. व्यावसायिकांना चांगले आर्थिक लाभ होणार आहे. 

कन्या रास (Virgo Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी माघी गणेश जयंती लाभदायक असणार आहे. ज्या बातमीची ते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते ती चांगली बातमी या लोकांना हनुमानजींच्या कृपेने कानी पडणार आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी काही पैसे गुंतवणार आहात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना जे मनात येत आहे ते करा त्यातून त्यांना नफा मिळणार आहे. तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखणार आहात. 

धनु रास (Sagittarius Zodiac) 

माघी गणेश जयंती धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे. धनु राशीच्या लोकांनानशिबाची साथ मिळणार आहे. त्यांच्या करिअरमध्ये त्यांची व्याप्ती वाढणार आहे. तुम्ही तुमच्या आई-वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाणार आहात. व्यवसायात आर्थिक समृद्धीचे शुभ संयोग घडणार आहेत. जोडीदारासोबत नात चांगल होणार आहे.

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

माघी गणेश जयंती या राशीच्या लोकांसाठी आनंददायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांमध्ये उच्च पातळीची ऊर्जा आणि आत्मविश्वास असणार आहे. प्रेम जोडप्याला नात्याबद्दल कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी मिळणार आहे. तुमची कोणाबद्दल जुनी नाराजी असेल तर ती दूर होणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)