Aquarius April 2024 Horoscope : कुंभ राशीसाठी एप्रिल महिना ठरणार पॉवरफूल! प्रगती, यश, पैसा आणि कुटुंबाची साथ

Aquarius Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रहांच्या राशी बदलणार असल्याने याचा परिणाम कुंभ राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. 

नेहा चौधरी | Updated: Apr 4, 2024, 11:19 AM IST
Aquarius April 2024 Horoscope : कुंभ राशीसाठी एप्रिल महिना ठरणार पॉवरफूल! प्रगती, यश, पैसा आणि कुटुंबाची साथ  title=
Aquarius April 2024 Horoscope Kumbh Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi

Aquarius Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे कुंभ राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Aquarius April 2024 Horoscope Kumbh Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi)

कुंभ राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना?

 टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांच्या भाकीतनुसार एप्रिल महिना हा कुंभ राशीच्या लोकांसाठी पॉवरफूल महिना ठरणार आहे. आनंद आणि यश तुम्हाला मिळणार असल्याने एप्रिल महिन्यात आनंदी राहा. कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला सहकार्य लाभणार आहे. प्रिय व्यक्तीसोबत अगदी दृढ्य असं नातं अनुभवणार आहात. आनंदी वातावरण असणार आहे. सामाजिक क्षेत्रातही तुम्ही खूप सक्रीय असणार आहात.
ज्येष्ठ व्यक्तीचे आशिर्वाद तुम्हाला लाभणार आहे. भावनिक दृष्ट्या स्थिर आणि सुरक्षित वाटणार आहे. पारंपरिक गोष्टीचं पालन करणार आहात. 

प्रोफेशन लाइफमध्ये तुम्हाला फायदा मिळणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. ऑफिसमध्ये सिनिअर आणि सहकारी यांचं पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. एक मैत्रीपूर्ण वातावरण तयार होणार आहे. स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगला महिना आहे. तुमच्या कुटुंबाचं व्यवसाय असेल तर त्यात तुम्ही सहभागी होणार आहात. 

 आर्थिकदृष्ट्या एप्रिल महिना स्थिर असणार आहे. अपेक्षेप्रमाणे तुम्हाला धनलाभ होणार आहे. पुरस्कार किंवा बोनसही तुम्हाला मिळणार आहे. कुठल्या तरी कुटुंबिक सदस्याकडून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. तुम्हाला प्रवास घडणार आहे. तुम्ही विकेशनलाही जाऊ शकता. 

हेसुद्धा वाचा - Capricorn April 2024 Horoscope : आव्हान, अडथळ्याने भरलेला एप्रिल महिना, जोडीदारासोबत वाद आणि शत्रू संख्येत वाढ

मात्र आरोग्याच्या दृष्टीकोनातून जरा काळजी घ्या. रुटीनमध्ये या आणि तुमच्या डाएटवर लक्ष ठेवा. लाइफस्टाइलवर लक्षकेंद्रीत करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्यामुळे तुम्ही जरा चिंतेत असणार आहात. 

कुंभ राशीच्या लोकांनी एप्रिलमध्ये करा हे उपाय !

एप्रिल महिन्यात कुंभ राशीच्या लोकांनी घरात धार्मिक कार्य केल्यास त्यातून तुम्हाला फायदा होईल. त्यासोबत घरातील ज्येष्ठ व्यक्तींची जास्त जास्त काळजी घ्या. त्या लोकांना मोठं गिफ्ट नक्की द्या. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)