Money Vastu Tips : अनेकांच्या जीवनात चढउतार येत असतात. काहींवर कर्जाचा बोजा असतो. तो कसा फेडायचा याचीच चिंता जास्त सतावत असते. तर प्रत्येक व्यक्तीला जीवनात सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळाव्यात असे वाटते. तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद पाठीशा कायम राहावा, असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी ते खूप मेहनत घेतात. एवढेच नाही तर यासाठी ते आपल्या काही स्वप्नांकडे दुर्लक्ष करतात. पण अनेक वेळा एवढं करुनही माणसाला त्याच्या अपेक्षानुसार सर्व गोष्टी मिळत नाहीत. तर कधी नशीब साथ देत नस्लायने काहींना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.
आर्थिक समस्या सोडविण्यासाठी काही उपाय केले तर त्यावर मात मिळवता येते. ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या हातात पैसा टिकत नसेल किंवा पैसा हातात येताच खर्च होतो. इतर कोणत्याही प्रकारची समस्या कायम राहिल्यास त्यासाठी वास्तुशास्त्रात एक छोटासा उपाय सांगण्यात आला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार लहान मातीच्या भांड्यात हा उपाय केल्यास खूप फायदा होतो. मातीच्या कलशाशी संबंधित या उपायांबद्दल जाणून घ्या.
हा उपाय केल्याने पैशाच्या चणचणीपासून होईल सुटका
माती कलश उपाय तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल घडवू शकेल. वास्तु तज्ज्ञांच्या मते, मातीच्या भांड्याचे काही उपाय तुमच्या घराची आर्थिक स्थिती सुधारु शकतात. हा उपाय करण्यासाठी एक लहान मातीचे भांडे घ्या आणि त्यात प्रत्येकी 1 रुपयांची 5 नाणी ठेवा. यानंतर या कलशात तांदूळ, गहू, बार्ली असे कोणतेही धान्य घ्या आणि ते वरपर्यंत भरा. यानंतर लाल रंगाचे कापड घेऊन कलशाच्या तोंडावर बांधावे.
ज्योतिषशास्त्रानुसार हा कलश माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ किंवा चित्राजवळ ठेवा आणि त्याची विधिवत पूजा करा. हा कलश दिवसभर तिथेच ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर तेथून उचलून घ्या. हा कलश तिजोरीत, अलमारी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ठेवा जेथे पैसा ठेवला जातो. हा उपाय केल्याने व्यक्तीला काही दिवसात पैसे मिळू लागतात. व्यक्तीला नशिबाची साथही मिळेल.
ज्योतिषशास्त्रानुसार नारळात लक्ष्मीचा वास असतो. असे म्हणतात की ज्या घरात नारळ ठेवला जातो, तिथे देवी लक्ष्मी वास करते. यासाठी एक नारळ घेऊन लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून कलव्याला बांधा. यानंतर हा नारळ देवी लक्ष्मीजवळ ठेवा आणि त्याची विधिवत पूजा करा. हे नारळ तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहील आणि सुख समृद्धी प्राप्त होईल.
शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करा. जर तुम्हाला आर्थिक संकट किंवा पैशाची हानी होत असेल तर यातून तुमची सुटका होईल. यासोबतच मातेची पूजा करण्यासोबत पिवळा तांदूळ अर्पण करा आणि पूजेच्या वेळी तिला घरी येण्याचे आमंत्रण द्या. घरी परत या आणि लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच गुलाबाची फुले आणि हार अर्पण करा. हा उपाय 11 शुक्रवारपर्यंत सतत करावा लागेल. यामुळे धनलाभ होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)