राशीभविष्य | 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी बढतीचे योग

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Nov 24, 2020, 07:35 AM IST
राशीभविष्य | 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी बढतीचे योग

मेष- व्यापाराच्या व्याप्तीविषयी आज विचार करु नका. आज कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. अवाजवी खर्च टाळा. अडचणी कमी होणार आहे. 

वृषभ- आर्थिक चणचण संपणार आहे. नोकरीच्या ठिकाणी इतरांचं सहकार्य मिळेल. चांगल्या व्यक्तींच्या सोबतीचा फायदा होणार आहे. अनेक अडचणींवर आपोआप तोडगा निघेल. आजचा दिवस आनंददायी आहे. 

मिथुन- आज काही नवे करार करण्याच्या विचारात असाल तर धैर्यानं पुढे जा. घाई मात्र करु नका. नातेसंबंध जपा. आहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. 

कर्क- दैनंदिन कामं पूर्णत्वास जातील. विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रेमसंबंधांमध्ये चांगला काळ आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. जेवणात मसालेदार पदार्थांचं सेवन टाळा.

सिंह- कुटुंबात सुख- शांती नांदेल. नोकरीच्या ठिकाणी कोणा एका व्यक्तीकडून तुम्हाला मदत होत आहे. तुमच्यासोबत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. 

कन्या- कामाचा व्याप वाढलेला असेल. काही अनोळखी व्यक्तींशी भेट होईल. भविष्यात ही मंडळी मदतीला येणार आहेत. दिवस थोडा थकवणारा असेल. 

तुळ- नोकरी आणि व्यवसायामध्ये लाभ होणार आहे. नशिबाची साथ असल्यामुळं अनेक चिंता दूर होतील. तुमच्या भावना कोणावरही लादण्याचा प्रयत्न करु नका. 

वृश्चिक- नोकरीच्या ठिकाणी बदली आणि बढतीचा योग आहे. विचाराधीन कामं पूर्ण होतील. अडकलेले पैसे परत मिळतील. आप्तजनांची भेट घडेल. 

धनु- नोकरीच्या बाबतीत अडचणी उदभवतील. त्यावर मात करण्याच्या दृष्टीनं अधिक धैर्यानं पुढे जा. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करा.  

मकर- कोणत्याही बाबतीत घाई करु नका. आर्थिक परिस्थिती सुधारण्यावर भर द्या. त्या मार्गानं पावलं उचला. काही अंशी अडचणी वाढतील पण, त्यावर मार्गही निघतील. त्यामुळं चिंता नसावी. 

कुंभ- आज बऱ्याच अंशी व्यग्र असाल. मेहनत करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. वेळ तुमच्या पक्षात आहे. अकडलेले पैसे परत मिळणार आहेत. काही व्यक्तींपासून मात्र सावध राहा. 

मीन- विचाराधीन कामं मार्गी लागतील. स्वत:ची काळजी घ्या. विवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. कौटुंबीक संबंध सुधारतील.