Shani Vakri: नव्या वर्षाच्या सुरुवातील शनी चालणार वक्री चाल; शनीदेव देतील नशिबाला कलाटणी

Shani Dev Vakri 2024: 2024 च्या सुरुवातीला अनेक ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहे. 2024 च्या सुरुवातीला शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीत वक्री होणार आहेत. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 2, 2023, 11:00 AM IST
Shani Vakri: नव्या वर्षाच्या सुरुवातील शनी चालणार वक्री चाल; शनीदेव देतील नशिबाला कलाटणी title=

Shani Dev Vakri 2024: ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह वक्री आणि मार्गस्थ होतात. नवीन वर्षासाठी आता अवघा एक महिना उरला आहे. आगामी 2023 मध्ये अनेक ग्रह त्यांच्या स्थितीमध्ये बदल करणार आहेत. यामध्ये कर्म देवता शनी देव वक्री चाल चालणार आहेत.

2024 च्या सुरुवातीला अनेक ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहे. 2024 च्या सुरुवातीला शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीत वक्री होणार आहेत. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. यावेळी शनीच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले क्षण येणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

कुंभ रास (Kumbh Zodiac)

शनिदेवाची वक्री चाल तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. महत्त्वाच्या व्यक्तींशीही तुमचे नवीन संबंध निर्माण होतील. तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. भागीदारीच्या कामातही तुम्हाला मदत मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळतील. 

वृषभ रास (Taurus Zodiac)

शनिदेवाची वक्री चाल तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकणार आहे. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असल्यास प्रवासालाही जाऊ शकता. उच्च शिक्षणाचे नियोजन करणाऱ्यांनाही लाभ मिळणार आहेत. व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो. 

मकर रास (Makar Zodiac)

शनिदेवाची वक्री चाल तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. या काळात तुमच्या जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. मकर राशीचे लोकांना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवण्यात यशस्वी होणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम देखील करतील.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )