पुढच्या वर्षी कर्तव्य आहे, तर पाहा हे ११३ मुहूर्त

जाणून घ्या लग्नाचे शुभ मुहुर्त 

पुढच्या वर्षी कर्तव्य आहे, तर पाहा हे ११३ मुहूर्त  title=

मुंबई : घरी लग्नाची गडबड आहे. घरची मंडळी कर्तव्याच्या मागे लागले आहेत? आणि तुम्ही देखील सात फेरे घेण्यासाठी तयार आहात तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची... 2019 मध्ये लग्नासाठी 113 शुभ मुहुर्त आहेत. या तारखा जाणून घेण्यासाठी ही बातमी जरूर वाचा 

2019 मधील 12 महिन्यांपैकी 10 महिने हे लग्नासाठी शुभ मुहुर्त आहेत. आता लग्नासाठी 113 दिवसांचा शुभ मुहुर्त आहे. फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात विवाहाकरता शुभ मुहुर्त नाही. इतर बाकी महिन्यात कधीही लग्न करू शकता. 2019 मध्ये खूप लग्नाचे मुहुर्त असल्यामुळे अनेकजण लग्न बंधनात अडकण्याची शक्यता आहे. लग्नाची मुहुर्त 

मार्च 2019 मध्ये सर्वात कमी पाच दिवसांचा शुभ मुहुर्त आहे. तर ऑक्टोबर महिन्यात 18 दिवस शुभ मुहुर्त आहेत. तर जानेवारीत 9 दिवस, फेब्रुवारीत 8 दिवस शुभ मुहु्र्त असून मार्च महिन्यात 5 तर एप्रिल महिन्यात 11 मुहूर्त आहेत. मे महिन्यात 16, जून महिन्यात 15, जुलै महिन्यात 8, ऑक्टोबर महिन्यात 18, नोव्हेंबर महिन्यात 15 तर डिसेंबर महिन्यात 8 असे शुभ मुहुर्त 2019 महिन्यात हे लग्नासाठी मुहुर्त आहेत. 

पौष महिन्यात विवाह होत नाहीत 

पौष महिन्यात लग्नाचे मुहुर्त नसतात. या महिन्यात लग्न केले जात नाहीत. 15 डिसेंबर 2018 मधील खरमास सुरू होत आहे. याची समाप्ती 13 जानेवारी 2019 मध्ये होणार आहे. या काळात विवाहाचे कोणतेच कार्य होत नाही. त्यानंतर विवाहाचे मुहुर्त हे मकर संक्रांती नंतर म्हणजे 15 जानेवारीनंतर सुरू होणार आहे. मकर संक्रांत यंदा 14 जानेवारी 2019 मध्ये होणार आहे. 

पुढील वर्षातील शुभ मुहु्र्त 

जानेवारी - 15, 17, 18, 22, 23, 25, 26, 27 आणि  29

फेब्रुवारी - 6, 8, 9, 10, 11, 21, 22 आणि  23

मार्च - 7, 8, 9, 10 आणि 12

एप्रिल - 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 26, 27 आणि 28

मे - 6, 7, 12, 13, 16, 17, 18, 19, 23, 24, 25, 26, 28, 29, 30 आणि 31

जून - 4, 8, 9, 10, 11, 12, 13, 16, 20, 21, 22, 24, 25, 26 आणि 27

जुलै - 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13

ऑक्टोबर- 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 13, 14, 15, 18, 19, 23, 24, 25, 29, 30 आणि 31

नोव्हेंबर - 1, 5, 8, 9, 10, 11, 13, 14, 19, 20, 21, 22, 23, 28 आणि 30

डिसेंबर - 1, 2, 3, 6, 7, 8, 11 आणि 12