मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार एखादी व्यक्ती त्याच्या जन्मतारखेनुसार भाग्यशाली क्षेत्रात काम करत असेल तर ती व्यक्ती लवकर यशस्वी होते. अंकशास्त्रावरुन व्यक्तीच्या स्वभावाबाबत तसेच व्यक्तीबाबतच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात.
१. एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख १,१०, १९ आणि २८ असेल तर ती व्यक्ती राजकारण, प्रशासकीय, कृषी, शिक्षणासंबंधित क्षेत्रात यशस्वी होतात.
२. ज्यांची जन्मतारीख २, ११, २० आणि २९ आहे त्यांनी थंड पेयपदार्थांशी संबंधित कामे, कांचेचं सामान, पाणीसंबंधित क्षेत्रात काम केल्यास फायदा होतो. या व्यक्तींसाठी मेडिकल क्षेत्रही लाभदायक ठरते.
३. जर एखाद्याची जन्मतारीख ३,१२, २१ आणि ३० असेल तर ज्ञान-विज्ञान, खेळ, मेडिकल, इंजीनियरिंग अथवा सीए सारख्या क्षेत्रात या व्यक्ती यशस्वी होतात.
४. तुमची जन्मतारीख ४,१३,२२ आणि ३१ आहे तर अशा व्यक्तींसाठी व्यवसाय लाभदायक ठरत नाहीत. या व्यक्तींनी जॉब करणे उत्तम. या व्यक्ती सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात यशस्वी ठरतात.
५. ज्यांची जन्मतारीख ५,१४ आणि २३ असेल तर अशा व्यक्ती विमा, बँकिंग क्षेत्रात यशस्वी होतात.
६. एखाद्याची जन्मतारीख ६,१५ आणि २४ असेल तर अशआ व्यक्तींनी कला क्षेत्रात काम करणे फायद्याचे ठरते. तसेच या व्यक्ती संगीत, अभिनय क्षेत्रातही चांगले नाव कमावतात.
७. ज्यांची जन्मतारीख ७,१६ आणि २५ आहे त्यांना इंजीनियरिंग, रिसर्च क्षेत्रात भाग्याची साथ लाभते.
७. जन्मतारीख ८,१७ आणि २६ असलेल्या व्यक्ती मशीनरी, प्रिंटिंग, लघु उद्योग, रत्नाशी संबंधित क्षेत्रात यशस्वी होतात.
८. ज्यांची जन्मतारीख ९,१८ आणि २७ आहे अशा व्यक्ती इंजीनियरिंगशी संबंधित क्षेत्रात अधिक यशस्वी होतात.