Black Thread Benefits : आपल्या आनंदाला कोणाची नजर लागू नये म्हणून आपण वेगवेगळे उपाय (Good Luck Remedies) करतो. बाळा किंवा सुंदर स्त्रीला वाईट नजरेपासून वाचविण्यासाठी आपण काळा टिका लावतो. आजकाल तर प्रत्येकाचा हाता पायात आपल्याला काळा धागा दिसतो. काही जण हा फॅशन म्हणून वापरतात तर काही जण आपल्याला कोणाची नजर म्हणजे नकारात्मक दृष्टी लागू नये म्हणून बांधतात. ज्योतिषशास्त्रात असंही सांगण्यात आलं आहे की. पायावर काळा धागा बांधल्याने कुंडलीतील राहू केतूची स्थिती मजबूत होते. याशिवाय पायात काळा धारण केल्यामुळे पैशाचे नवीन स्रोत उपलब्ध होतात. ज्यामुळे घराची आर्थिक स्थिती मजबूत होते. पायावर काळा धागा बांधल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊयात काय फायदे होतात ते...(Black Thread Benefits for money Black Thread in Leg remedy and boy girl ties which leg shani rahu ketu upay marathi news)
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहू-केतूची स्थिती कमकुवत असते, त्यांनी एका पायात काळा धागा बांधावा. असं केल्यामुळे राहू-केतू प्रसन्न होतात आणि जीवनातील अनेक समस्या आपोआप दूर होतात, असं शास्त्रात मानतात.
शनीच्या प्रकोपापासून कोणी वाचू शकतं नाही. ज्या व्यक्तीवर शनीदेवाचा राग असतो त्याचा आयुष्यात शनीची धैय्या आणि साडेसती सुरु होते. शास्त्रात या उपाय सांगण्यात आला आहे. जर पायात काळा धागा बांधल्याने शनिदेव प्रसन्न होतो आणि घरगुती कलह, आर्थिक संकट नाहीसे होतात.
राहू केती आणि शनीसाठी काळा धाग्याचा उपाय तुम्हाला समजला. आता काळा धागा कुठल्या दिवशी बांधावा आणि स्त्रियांनी (In which leg should women tie black thread) आणि पुरुषांनी (Men should tie a black thread in which leg) कुठल्या पायात तो घालावा हे जाणून घेऊयात. तर स्त्रियांना पायात काळा धागा बांधायचा असेल तर डाव्या पायात घालणे योग्य आहे. मुलींनी शनिवारी हा धागा पायात घालावा. असं केल्यानं मानसिक शांती मिळते आणि आरोग्य चांगले राहतं. तर पुरुषांनी उजव्या पायात काळा धागा बांधावा. पुरुषांसाठी काळा धागा घालण्यासाठी मंगळवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. असं केल्यानं कुंडलीत शनी बलवान होतो, शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)