बुध ग्रह 26 ऑक्टोबरपर्यंत मूल त्रिकोण कन्या राशीत, तीन राशींवर असेल प्रभाव

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतात. त्यामुळे राशी चक्रातील 12 राशींवर परिणाम होत असतो. काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ फळं मिळतात. 

Updated: Sep 18, 2022, 01:21 PM IST
बुध ग्रह 26 ऑक्टोबरपर्यंत मूल त्रिकोण कन्या राशीत, तीन राशींवर असेल प्रभाव title=

Budh Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतात. त्यामुळे राशी चक्रातील 12 राशींवर परिणाम होत असतो. काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ फळं मिळतात. बुध ग्रह 21 ऑगस्टला मूल त्रिकोण राशी असलेल्या कन्या राशीत प्रवेश केला आहे. या राशीत बुध ग्रह 61 दिवसांपर्यंत असणार आहे. यामुळे तीन राशींवर सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.

सिंह: बुध ग्रह गोचराचा सिंह राशीच्या लोकांना फायदा होईल. या राशीच्या गोचर कुंडलीतील दुसऱ्या स्थानात बुध ग्रह आहे. स्थान धन आणि वाणीचे स्थान आहे. या काळात धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. महत्त्वपूर्ण व्यापारी करार निश्चित होऊ शकतात. वकील, मार्केटिंग आणि शिक्षकांसाठी हा काळ भरभराटीचा असेल. सिंह राशींचा स्वामी सूर्य असून बुध ग्रहाशी मित्रता आहे. त्यामुळे हा गोचर काळ शुभदायी ठरू शकतो.

वृश्चिक: बुधाचा राशी बदल तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी लाभदायी ठरु शकतो. बुध तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीतील अकराव्या भावात प्रवेश करत आहे. हे स्थान उत्पन्न आणि नफ्याचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल.  या काळात तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. दुसरीकडे, राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांना चांगले यश मिळू शकते. 

धनु: कन्या राशीत बुध ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण दशम भावात बुध ग्रह गोचर करत आहे. या स्थानाला व्यवसाय आणि नोकरीचे स्थान मानले जाते. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन आणि वेतनवाढ मिळू शकते. व्यवसायात नवीन संबंध निर्माण करून चांगले आर्थिक लाभ होऊ शकतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)