Budhaditya-Viprit Rajyog: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानुसार, त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये ग्रह, कुंडली आणि राजयोगाला खूप महत्त्व मानलं जातं. ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेक ग्रहांचा संयोग आणि राजयोग तयार होतो. अशातच ग्रहांचा राजकुमार आणि व्यापार, बुद्धिमत्ता, विवेक आणि वाणीचा कारक असलेल्या बुध ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केल्याने 2 खास राजयोग तयार होणार आहे.
बुध ग्रहाच्या गोचरमुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. दुसरीकडे सूर्य त्याच वृश्चिक राशीत देखील स्थित आहे. यावेळी सूर्य आणि बुध यांचा संयोग देखील तयार झाला आहे. या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. या राजयोगामुळे 4 राशींना खूप फायदा झाला आहे.
कन्या रास
या राशींना सूर्य आणि बुध यांचे आशीर्वाद मिळणार आहे. बुधादित्यासोबत विपरीत राजयोगाची निर्मिती स्थानिकांसाठी खूप अनुकूल ठरू शकणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ते फलदायी ठरेल. व्यापार्यांनाही या काळात नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. प्रलंबित पैसे मिळू शकतात
कर्क रास
या राशींना बुध आणि सूर्याचा आशीर्वाद मिळणार आहे. बुधादित्य आणि विपरित राजयोगाची निर्मिती काही वरदानापेक्षा कमी नाही. प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे. अडकलेले किंवा रोखलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. लव्ह पार्टनरशी संबंध चांगले राहतील आणि कामात यश मिळेल.
मकर रास
बुधादित्य आणि विपरित राजयोगाची निर्मिती स्थानिकांसाठी फलदायी ठरू शकणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना बढती आणि वेतनवाढीचा लाभ मिळू शकतो. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. मान-सन्मान वाढेल आणि नोकरदारांना काही नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरदारांसाठी काळ चांगला राहील. गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
धनु रास
बुधादित्य आणि विपरित राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. परदेशात करिअर करण्याच्या काही संधी मिळू शकतात. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकतं. नोकरी-व्यवसायात प्रगती होणार आहे. परदेशात शिक्षण घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )