Raksha Bandhan Niyam in Marathi : हिंदू धर्मात रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाला समर्पित केलाय. पण रक्षाबंधन हा फक्त भाऊ-बहिणीचा सण आहे का? पत्नी नवऱ्याच्या मनगटावर राखी बांधू शकत नाही का? पत्नी जेव्हा नवऱ्याला राखी बांधते तेव्हा अनेक जण विनोदही करतात. आज काल बहीण भाऊ वेगवेगळ्या शहरात राहता. अशा परिस्थितीत जेव्हा बहिणीची राखी भावाच्या घरी येते. तेव्हा ती भावाच्या हातावर बांधायला अनेक ठिकाणी बायको घरात असते. मग अशावेळी बायको नवऱ्याचा मनगटावर राखी बांधणे योग्य की अयोग्य? (Can wife tie rakhi on husband wrist Raksha Bandhan Niyam in Marathi )
खरं तर राखी बांधण्याबाबत पुराणात आणि धार्मिक ग्रंथांमध्ये आढळणाऱ्या कथांवर विश्वास ठेवला तर कोणीही कोणालाही रक्षासूत्र बांधू शकतो. म्हणजे जी व्यक्तीच्या सावलीत तुम्हाला सुरक्षता वाटते त्या व्यक्तीला तुम्ही रक्षासूत्र बांधू शकतो. भविष्य पुराणातील कथेनुसार देवराज इंद्राची पत्नी शची हिने रक्षासूत्र बांधण्याची सुरुवात केली होती. कथेनुसार पती देवराज इंद्राला वृत्रासुराशी युद्ध करायला जाणार होता तेव्हा सर्वप्रथम इंद्राणी शचीने तिच्या पतीला रक्षासूत्र म्हणजे राखी बांधली होती.
वृत्रासुर अजिंक्य होता, त्याने पहिल्या युद्धात देवराज इंद्राचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत जेव्हा देवराज इंद्र दुसऱ्यांदा वृत्रासुराशी युद्धास निघणार होता. तेव्हा श्रावण महिन्याचे आगमन होणार होते. त्यामुळे देवी इंद्राणीने विशेष सूत्र तयार करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी मागितला होता. पती देवराज युद्धाला निघण्यापूर्वी त्यांच्या मनगटावर इंद्राणीने रक्षासूत्र बांधले, हा दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. शची देवीसोबतच इतर देवतांच्या पत्नींनीही आपल्या पतीच्या मनगटावर रक्षासूत्र बांधून त्यांना युद्धासाठी पाठवलं. या कथेवरून स्पष्ट होते की, पत्नीही पतीला रक्षासूत्र बांधू शकतात.
फक्त भाऊ-बहिणीतच नाही तर गुरू आणि शिष्यातही रक्षाबंधन साजरी करु शकतात. शिष्य गुरूला राखी बांधू शकतात. पुजारी यजमानाला रक्षासूत्र बांधू शकतो. भक्त त्यांच्या देवाला रक्षासूत्र बांधू शकतात. राजा आपल्या सैनिकांना. स्वार त्यांच्या वाहनाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधू शकतात.
रक्षाबंधन आणि राखीबद्दल एक समज असाही आहे की, बहीण भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते तेव्हा भाऊ तिच संरक्षण करण्याच वचन देतं. पण एका पौराणिक कथेनुसार जेव्हा आपण रक्षासूत्र किंवा राखी बांधतो तेव्हा या व्यक्तीच्या दीर्घायुष्य आणि रक्षणाची प्रार्थना करतो.
तर द्रौपदी आणि श्रीकृष्णाची कथेनुसार जेव्हा श्रीकृष्णाचा बोटाला इजा झाल्यावर द्रौपदीने साडीचा पदर फाडून बांधला होता. तेव्हा द्रौपदीच्या सन्मानाचे रक्षण करण्याचे आश्वासन श्रीकृष्णाने दिले होते. शेवटी रक्षासूत्र हे दोन्ही नात्यासाठी महत्त्वाचे आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)