Chanakya Niti For Success : आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचे आपण आचरण केले तर ते तुमच्या फायद्याचे आहे. चाणक्य यांचा जन्म सुमारे 3 हजार वर्षांपूर्वी झाला होता. ते भारताचे एक महान तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि लष्करी रणनीतीकार होते. त्यांनी समाज, राष्ट्र, राजकारण आणि लष्करी क्षमता यावर नीती शास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याला चाणक्य नीती असे म्हणतात. यामध्ये आचार्य चाणक्य यांनी अशा अनेक अमूल्य गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या शेकडो वर्षांनंतरही आजही पूर्णपणे प्रासंगिक आहेत. आचार्य चाणक्य यांनी या पुस्तकात सांगितले आहे की, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला पैसा मिळतो तेव्हा त्याने चुकूनही 5 गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका. असे न केल्यास त्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. जाणून घ्या या कोणत्या गोष्टी आहेत ते.
चाणक्य नीतीतील या गोष्टींचे पालन केले तर ते तुमचे फायद्याचे असेल. तुम्हाला अचानक कुठूनही पैसा मिळतो तेव्हा आनंदी होणे ही एक सामान्य बाब आहे. जेव्हा तुम्हाला अचानक पैसे मिळतात तेव्हा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. पैसा आल्यावर ही चूक कधीही करु नका.
अनेक वेळा पैसा आला की लोक धुंदीत राहतात. व्यर्थ दिखावूपणा दाखवू लागतात. अशी चूक तुम्ही कधीही करु नये. लोक अशा लोकांना टाळतात आणि त्यांच्यापासून अंतर ठेवू लागतात. त्याऐवजी, तो पैसा स्वतःच्या आणि इतर लोकांच्या भल्यासाठी वापरला पाहिजे. यामुळे लक्ष्मी देवता प्रसन्न होते.
आचार्य चाणक्य सांगतात की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा तो विचारपूर्वक खर्च केला पाहिजे. संकटकाळात पैसा हा सर्वात मोठा मित्र असतो. अशा परिस्थितीत जे पैसे सुरक्षितपणे ठेवत नाहीत, त्यांना वाईट काळात संकटाचा सामना करावा लागतो.
चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा बाहेरील लोकांशी चर्चा करु नये. यावर चर्चा केल्याने चोर आणि शत्रू सक्रिय होतात. ते तुमचे नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे याबाबत मौन बाळगा आणि पैशाच्या सुरक्षिततेबाबत सावध राहा.
आपल्या हातात पैसा आला म्हणजे सगळे काही हातात आले असा समज करुन घेऊ नका. पैसा आज आहे आणि उद्या नाही. पैशाचा वापर इतरांना अपमानित करण्यासाठी किंवा कोणाचे नुकसान करण्यासाठी करु नये. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे घरामध्ये गरिबी येते. म्हणूनच पैशाचा उपयोग सकारात्मक पद्धतीनेच केला पाहिजे.
जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पैसा येतो तेव्हा त्याने कधीही अहंकारी किंवा गर्विष्ठ होऊ नये. संपत्तीचे प्रदर्शन केल्याने शत्रूंची संख्या वाढते आणि लोक त्यांच्यावर नाराज होऊ लागतात. त्यांचा हा अतिउत्साह कधी कधी त्यांच्यावर मात करतो, असे आचार्य चाणक्य नीतीत सांगितले आहे.