Chandra Grahan 2024 : होळीला केवळ ग्रहणच नाही तर सूर्य आणि राहूचा संयोगही घातक, 'या' राशीच्या लोकांना राहावं लागेल सुरक्षित

Lunar Eclipse 2024 : होळीच्या दिवशी चंद्रग्रहणासोबतच मीन राशीत ग्रहण योग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण योग हा अतिशय अशुभ मानला जातो. 

नेहा चौधरी | Updated: Mar 10, 2024, 12:10 PM IST
Chandra Grahan 2024 : होळीला केवळ ग्रहणच नाही तर सूर्य आणि राहूचा संयोगही घातक, 'या' राशीच्या लोकांना राहावं लागेल सुरक्षित  title=
Chandra Grahan 2024 Not only eclipse on Holi but conjunction of Sun and Rahu is dangerous these zodiac sign shave to stay safe

Chandra Grahan Effect Holi : यंदाच्या होळीवर या वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाची सावली आहे. पण नुसतं चंद्रग्रहण नाही तर धोकादायक आणि अतिशय अशुभ असा ग्रहांचा संयोगही यादिवशी होणार आहे. ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि क्रूर ग्रह राहूच्या संयोगातून घातक असा ग्रहण योग निर्माण होणार आहे. त्यामुळे यंदाची होळी ही चंद्रग्रहणाच्या सावलीसोबत सूर्य आणि राहूच्या संयोगातून निर्माण झालेल्या ग्रहण योगात असणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण आणि ग्रहण योग हे अतिशय घातक आणि धोकादायक मानले जातात. चंद्रग्रहण आणि सूर्य - राहूचा ग्रहण योग काही राशींसाठी नकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. (Chandra Grahan 2024 Not only eclipse on Holi but conjunction of Sun and Rahu is dangerous these zodiac sign shave to stay safe)

होळी 2024 वर चंद्रग्रहणाची सावली

पंचांगानुसार होलिका दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या रात्री करण्यात येतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळण्यात येते. यावर्षी होलिका दहन 24 मार्चला तर धुलिवंदन म्हणजे रंगांची उधळण 25 मार्चला साजरी करण्यात येणार आहे. याशिवाय यावर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे होळीच्याच दिवशी असणार आहे. हे चंद्रग्रहण पेनम्ब्रल चंद्रग्रहण असून भारतीय वेळेनुसार सोमवार 25 मार्चला सकाळी 10:23 वाजता सुरू होणार असून दुपारी 03:02 वाजेपर्यंत असणार आहे. मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने सूतक काळ पाळायचा नाही आहे.  वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण हे इटली, जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम, दक्षिण नॉर्वे, स्वित्झर्लंड, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, जपान, रशियाचा पूर्व भाग, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये पाहिला मिळणार आहे. 

होळीवर ग्रहांची हालचाल

यंदा होळीच्या दिवशी चंद्रग्रहणासोबतच मीन राशीतही ग्रहण योगाची छाया असणार आहे. याशिवाय 25 मार्चला होळीच्या एक आठवडा आधी म्हणजे 18 मार्चला शनिदेवाचा उदय होणार आहे. शिवाय होळीपूर्वी सूर्याची राशीही बदलणार आहे. कुंभ राशीतून प्रवास संपवून सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. जिथे मीन राशीत राहु आधीपासून विराजमान आहे. अशा स्थितीत होळीच्या चंद्रग्रहणासोबत मीन राशीमध्ये सूर्य-राहू संयोगही होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा राहू, सूर्य आणि चंद्राचा संयोग होतो तेव्हा ग्रहण योग निर्माण होतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहण योग हा अशुभ योग मानला गेला आहे. अशाप्रकारे होळीच्या चंद्रग्रहणासोबत मीन राशीत सूर्य-राहूचा संयोगही धोकादायक योग निर्माण करणार आहे.

'या' राशीच्या लोकांनी राहवं सावधान!

चंद्रग्रहणासोबतच होळीच्या दिवशी मीन राशीत ग्रहण योगाची सावली असणार आहे. अशा स्थितीत सर्व राशीच्या लोकांवर याचा परिणाम दिसणार आहे. पण कन्या, तूळ, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. या लोकांच्या कामामध्ये अडथळे येणार आहेत. या लोकांचं आर्थिक नुकसान होणार आहे. कामाच्या ठिकाणी अपयश येणार आहे. नोकरदार लोकांना कामात अडचणी निर्माण होणार आहे. आर्थिक आघाडीवर नुकसानीसह तब्येत बिघडणार असल्याचं भाकीत ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी केलंय. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)