Eclipse Effect on Zodiac Signs:ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. ग्रह आपल्या भ्रमण कालावधीनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. काही ग्रह एखाद्या राशीत दीर्घ कालावधीसाठी राहतात. तर काही ग्रह अल्पावधीतच राशी बदल करतात. गोचर कुंडलीनुसार चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करतो, तर शनि अडीच, राहु-केतु दीड वर्षांनी राशी बदल करतात. त्यामुळे गोचर कालावधीत एका राशीत एका पेक्षा अधिक ग्रह एकत्र येतात. यामुळे शुभ-अशुभ योग तयार होतात. आज म्हणजेच 16 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 9 वाजून 6 मिनिटांनी चंद्र आणि राहुची युती होणार आहे. त्यामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. 19 ऑगस्ट 2022 पर्यंत हा योग मेष राशीत असणार आहे. त्यामुळे पुढील सव्वा दोन दिवस काही राशींना काळजी घेणं आवश्यक आहे.
चंद्र ग्रह मनाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे राहुसोबत युती झाल्याने चंद्राला ग्रहण लागतं. यामुळे गोचर कुंडलीत चंद्र कमकुवत होतो. असं असलं तरी काही वेळेस हा योग काही राशींसाठी फलदायी ठरते. चला तर जाणून घेऊयात पुढील 57 तास कोणत्या राशींना फायदेशीर ठरतील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)