Horoscope 28 November 2021 | या राशीच्या लोकांना कामात यश मिळेल, वाचा राशीभविष्य

रविवारचा दिवस (Horoscope 28 November 2021 ) कसा जाईल, हे जाणून घेऊयात प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे सुपुत्र चिराग दारूवाला यांच्याकडून. 

Updated: Nov 27, 2021, 11:02 PM IST
Horoscope 28 November 2021 | या राशीच्या लोकांना कामात यश मिळेल, वाचा राशीभविष्य

मुंबई : रविवारी मेष आणि वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या शत्रूंनी निर्माण केलेल्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. रविवारचा दिवस (Horoscope 28 November 2021 ) कसा जाईल, हे जाणून घेऊयात प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे सुपुत्र चिराग दारूवाला यांच्याकडून. (daily Horoscope 28 November 2021 Know all zodiac signs astrology predictions)
 
मेष (Aries)  : आजचा दिवस शुभ आहे.  काहींना गुणवत्तेनुसार बढती मिळू शकते. लग्न किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात जाण्याचीही शक्यता आहे. जर तुम्ही  पुन्हा परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर लवकरच या दिशेने पावले उचला.

वृषभ  (Taurus) : रविवारी तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. तुमची बचत तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरेल.
 
मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या शत्रूंनी निर्माण केलेल्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.  अधिकाऱ्यांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. त्यांचा विरोध करु नका. आरोग्यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

कर्क (Cancer) : मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला हुशारीने सामना करावा लागेल. मालमत्तेत केलेली गुंतवणूकीतून अपेक्षित परतावा मिळणार नाही. 

सिंह (Leo) : वादग्रस्त आणि हट्टी असू शकता.  आव्हानत्मतक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबियांसह तीर्थयात्रेला जाण्याचा योग आहे. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. 

कन्या (Virgo) : प्रेमप्रकरणात गुंतलेले लोक त्यांच्या जोडीदाराच्या भावना पूर्णपणे अनुभवू शकतील. नोकरी शोधणाऱ्यांना यशस्वी होण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील.

तुळ (Libra) : तुम्ही जे काही कराल त्यात तुम्ही उत्साही असाल. विचारपूर्वक घेतलेले निर्णय दीर्घकाळ प्रभावी राहतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा शक्य आहे.

वृश्चिक (Scorpio) :  तुम्‍हाला इतरांसोबत व्‍यावसायिक व्‍यवहार करण्‍याची संधी मिळेल. तुमची लोकप्रियता वाढेल. व्यवसायातून तुमची कमाई वाढेल. अधिकार्‍यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमी युगुलांसाठी वेळ शुभ नाही.

धनु (Sagittarius) : दिवसाची सुरुवात व्यवसायाच्या संदर्भात एखाद्या नवीन उपक्रमाने होऊ शकते. तुम्ही नवीन करार निश्चित करू शकता जे भविष्यात खूप फायदेशीर ठरेल. लोकांकडून मान-सन्मान मिळेल. 

मकर (Capricorn) :  प्रभावशाली लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल. तुम्ही नवीन भागीदारी करू शकता आणि तुमचा नफा वाढवू शकता. कामानिमित्त परदेशात जायचे असेल तर प्रयत्नपूर्वक पुढे जा.

कुंभ (Aquarius) : बुद्धिमत्तेमुळे सर्व कामं चांगल्या पद्धतीने कराल. प्रभावी आवाज असल्यामुळे तुमचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवू शकाल.  व्यवसायात चांगले काम करून भरपूर नफा कमवू शकाल. प्रवासातही फायदा होईल.

मीन (Pisces) : तुमच्यापैकी काही लोक चांगले संपर्क वाढवतील. व्यवसायाच्या संदर्भात दूरचा प्रवास करण्यासाठी रविवार हा अनुकूल दिवस आहे.