आजचे राशिभविष्य | शुक्रवार | १ फेब्रुवारी २०१९

जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल.

Updated: Feb 1, 2019, 07:46 AM IST
आजचे राशिभविष्य | शुक्रवार | १ फेब्रुवारी २०१९ title=

मेष- कामात अडथळे आल्यामुळे जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. नोकरी किंवा व्यवसायात एखादा निर्णय घाईने घेतल्यास नुकसान होण्याची शक्यता. आर्थिक गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या.

वृषभ- नोकरी आणि व्यवसायात फायदा होण्याची शक्यता. जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. अविवाहित तरुण-तरूणींना प्रेमाचे क्षण अनुभवायला मिळतील. कामाच्या पद्धतीमधील बदल फायदेशीर ठरेल. 

मिथुन- आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर एखादी नवी जबाबदारी दिली जाईल. बऱ्याच काळापासून रेंगाळत पडलेल्या कामांना गती येईल. दिवस उत्साहात जाईल. 

कर्क- नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांवर छाप पाडाल. नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर ग्रहमान अनुकूल आहे. व्यवसायात नवीन व्यवहार होतील. आत्मविश्वास वाढेल.

सिंह- नोकरी किंवा व्यवसायात आज यश मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. भविष्यासाठी पैशांची बचत करा. 

कन्या- नोकरी आणि व्यवसायात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस. मिळकत वाढेल, तसेच खर्च आटोक्यात ठेवण्याचा विचार कराल. महत्त्वाच्या लोकांची भेट होऊ शकते. 

तूळ- बऱ्याच काळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता. नोकरी किंवा व्यवसायात अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने समस्या निर्माण होऊ शकते. तुमच्या योजनांना विरोध होईल. निर्णय घेण्यासाठी जोडीदाराशी सल्लामसलत करा. 

वृश्चिक- नोकरी आणि व्यवसाय दोन्हींसाठी लाभदायक दिवस. हितशत्रूंना शह देण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता. 

धनु- नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. व्यवसायातही कायदेशीर गोष्टींपासून सावध राहा. प्रेमप्रकरणात नवीन ट्विस्ट येऊ शकतो. प्रकृती सांभाळा.

मकर- एखादी मोठी अडचण दूर होईल. त्यामुळे दिवस उत्साहात जाईल. मात्र, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता.

कुंभ- नोकरी आणि व्यवसायाच्यादृष्टीने चांगला दिवस. ऑफिसमधील सहकाऱ्यांकडून मदत होईल. मालमत्तेचे व्यवहार करण्यासाठी चांगला दिवस. 

मीन- अचानक लाभ होण्याचा संभव. जोडीदाराकडून मदत मिळू शकते. अनावश्यक गोष्टींवरील खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर नवी जबाबदारी सोपवली जाऊ शकते.