आजचे राशिभविष्य | गुरुवार | 31 जानेवारी 2018

असा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Jan 31, 2019, 07:46 AM IST
आजचे राशिभविष्य | गुरुवार | 31 जानेवारी 2018

मेष : त्रासातून मुक्ती मिळेल. अचानक फायदा होईल. कामकाजात मन लागेल. सकारात्मक राहा. जे काही मनात येईल ते तात्काळ बोलून दाखवण्याचा प्रयत्न करा. काही बोलण्याआधी विचार नक्की करा. पैशांची प्रकरणे सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. घरा संदर्भातील तुमची योजना यशस्वी होईल. रोजची कामे अडकणार नाहीत. राजकिय मंडळींना फायदा होईल. 

वृषभ : तुम्ही थोडे चंचल आहात.. आईचे सुख मिळेल. वेळेप्रमाणे सर्वकाही ठिक होईल. मित्रांसोबत वेळ चांगला जाईल. अडकलेली कामे जोडीदाराच्या मदतीने पूर्ण होतील.तुम्हाला ज्यांना मनातील भावना सांगायच्या आहेत त्या व्यक्तीला तुमचं म्हणणं समजेल. मनाच ऐकाल तर सर्व काही ठिक राहील. तुमचे इनकम आणि खर्च समान राहीलं.

मिथून : मित्र आणि भावांकडून सहकार्य मिळेल. अचानक कोणते तरी खास काम करावे लागेल. आज अशीच कामे करा जी लवकर पूर्ण होतील. परिवाराच्या गरजा आणि कामकाज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. 

कर्क : तुम्ही खूप उत्साहित असाल. खूप प्रकराच्या जबाबदाऱ्यात तुम्ही व्यस्त असाल. व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न कराल. कोणते जुने कामही संपवण्याचा प्रयत्न कराल. जागेच्या नकाशात काही बदल होण्याचे योग आहेत. मुलांचे सहकार्य मिळेल. विवाहाचे प्रस्ताव देखील मिळू शकतात. नोकरदार आणि व्यवसाय करणाऱ्यांना कमाईचे नवे मार्ग मिळतील.

सिंह : कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या कामाचा मोठा परिणाम पाहायला मिळेल. तुमच्या डोक्यात पैशांसदर्भातील खूप सारे प्लानिग सुरू असेल. कोणता जुना मित्र भेटण्याचा योग आहे. नव्या नोकरी बद्दल तुम्हाला आज कळू शकते. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. 

कन्या : व्यवसायात प्रगतीचे योग राहतील. तुमची महत्वाकांक्षा वाढेल. आजुबाजूचे किंवा सहकार्यांना कोणत्या कामासाठी तुमची मदत लागेल. प्रवासाचे योग येतील. कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी कमी होतील. तुमची काही कामे पूर्ण होतील. आज तुम्हाला चांगला अनूभव येईल.

तूळ : तुमचे लक्ष परिवार आणि पैशांवर असेल. प्रत्येक संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करा. तुमची सारी कामे वेळेवर पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुम्हाला कोणता तरी पुरस्कार किंवा सन्मान मिळेल. घटना हळूहळू तुमच्या बाजूने होतील. धन लाभ होण्याचा योग आहे. आई-वडील, भाऊ-बहीणीचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक : तुमच्या कामाकडे लक्ष द्या. न विचलित होता काम करण्याच्या क्षमतेमुळे तुम्ही पूर्णपणे यशस्वी व्हाल. तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागेल. बॉस सोबत कोणत्या तरी खास कारणासाठी बोलणी होतील. विवाहाचे प्रस्ताव मिळतील. नवे मित्र बनतील. तुमचे मन प्रसन्न राहील. सर्वांशी प्रेमाने व्यवहार कराल. आजुबाजूचे आणि सहकार्यांची मदत मिळेल. 

धनू : तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. कोणती नवी जमीन विकत घेण्याचा विचार कराल. राहण्याच्या किंवा कामाच्या ठिकाणी बदल करण्याचा विचार कराल. परिवार किंवा आवडत्या व्यक्तीसाठी पैसै खर्च करण्याचा विचार कराल. आज तुम्ही कामात यशस्वी व्हाल. ठरवलेली कामे पूर्ण होतील. अशी कामे समोर येतील ज्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. अडकलेला पैसा मिळेल. 

मकर : तुमच्या तांत्रिक अडचणी दूर होतील. तुमच्या मनात खूप दिवसांपासून सुरू असलेला तणाव संपेल. तुम्हाला अनेक प्रकरणांत जबाबदारी मिळेल आणि त्याची काळजीही घ्यावी लागेल. ज्या वस्तू तुमच्यासाठी खरंच गरजेच्या आहेत त्यासाठी तुम्हाला कोणतीही समजदारी दाखवण्याची गरज नाही. तुम्ही अचानक कोणता तरी निर्णय घ्याल. 

कुंभ : कोणती तरी आनंदाची बातमी मिळेल. अडकलेले आणि थांबलेली काम पूर्ण करण्यासाठी दिवस योग्य आहे. रोजच्या कामातून फायदा मिळेल. सामाजिक कामातून तुम्हाला यश मिळेल. खास लोकांशी चांगले संबंध बनतील. कोणत्या सहकाऱ्या सोबत मिळून केलेल्या कामात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचे लक्ष मित्रांसोबत होणाऱ्या कार्यक्रमाकडे राहील. 

मीन : पुढे जाण्यासाठी तुम्हाला अधिक संधी मिळण्याच्या शक्यता आहेत. पैशांच्या प्रकरणात तुम्ही बारकाईने विचार करा. सकारात्मकता ठेवा. काही खास कामे पूर्ण होतील. कोणत्या नव्या व्यक्तीप्रति आकर्षण वाटेल. आत्मविश्वासामुळे रोजची कामे पूर्ण होतील. नव्या लोकांशी मैत्री होईल.