Horoscope 12 November 2023 : आज नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज देशभरात दिवाळीचा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. आजच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी, गणेश आणि कुबेर महाराज यांची पूजा करण्याची परंपरा आहे. तर जाणून घेऊया आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. व्यवसायात काही नवीन काम सुरू करू शकता.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी वैवाहिक नात्यात आनंद राहील. रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. तुमच्या प्रियकराला तुमच्या आवडीचा ड्रेस गिफ्ट करू शकता.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी वरिष्ठांकडून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. कुटुंबात कोणाच्या तरी प्रगतीमुळे उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. खाजगी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यातही मेहनत करून यश मिळवू शकता.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी तुमच्या पार्टनरच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेऊ शकता. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर रहा.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही शेअर मार्केट किंवा बाजारात पैसे गुंतवलेत तर तुम्हाला त्यातही नफा मिळू शकतो.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींची आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून सरप्राईज मिळेल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी एखादा मित्र तुम्हाला आर्थिक मदतीसाठी विचारू शकतो. भाऊ-बहिणीमध्ये चांगले संबंध निर्माण होतील.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी तुमचे वैवाहिक नाते मजबूत करण्यासाठी एकमेकांना समजून घ्या. तुम्हाला कोणत्याही प्रकारची पैशाची कमतरता भासणार नाही.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. एक नवीन व्यक्ती तुमच्या कुटुंबात सामील होऊ शकते.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी तुम्ही एखाद्याला दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस चांगला जाईल.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी बिझनेसमध्ये तुम्हाला कमी मेहनतीने जास्त नफा मिळेल. अचानक आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )