Horoscope 19 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल तर योग्य आहे. तुमच्या डोक्यात अनेक गोष्टी असतील पण चिंता करू नका.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी तुम्ही नवीन जगासोबत चालण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला समजून घेण्यात अनेकदा लोकं कमी पडतात पण आजचा दिवस वेगळा आहे.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी तुमचा शत्रू समाजातील तुमची जागा घेण्याचा प्रयत्न करेल. एखाद्या गोष्टीच्या तणावामुळे तुमचे मन कामात रमणार नाही.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी गुंतवणूक करायची असेल, तर करू शकता, नफा होईल. आर्थिक बाबींवर अधिक लक्ष द्याल.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवावे लागेल. परदेशातून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी नोकरीत सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. व्यवसायात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जास्त राहील.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. नोकरीत तुम्हाला अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी कौटुंबिक कामात पैसा खर्च होईल. सकारात्मक राहा. समस्या सोडवण्यात यश मिळेल.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी हिंमत आणि बुद्धीने बिघडलेल्या गोष्टी सुधाराल. गेल्या अनेक दिवसांपासून विचाराधिन असलेली कामं पूर्ण करु शकता.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी कोणतंही मोठं पाऊल उचलताना विचार करा. वाद होण्यापासून टाळा. जुन्या राहिलेल्या कामांना गती मिळेल.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी गोंधळाची स्थिती असल्यास विचार करुन पुढे जा. इतरांशी बोलताना विनम्रता बाळगा.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी नोकरी, व्यवसायाकडे लक्ष देण्याची गरज आहे. जोडीदाराशी असलेले जुने गैरसमज दूर होतील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.