Horoscope 29 October 2023 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 29, 2023, 06:19 AM IST
Horoscope 29 October 2023 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

Horoscope 29 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Add Zee News as a Preferred Source

मेष (Aries)

आजच्या दिवशी ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. तुम्हाला काही जुने वडिलोपार्जित पैसे मिळू शकतात.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी तुमचा जोडीदार तुम्हाला धोका देऊ शकतो. नोकरीत विरोधकांपासून थोडं सावध राहा.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी पैसे खर्च केल्याने तुम्हाला फायदे देखील मिळू शकतात. संध्याकाळी काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी काही तणावामुळे तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटू शकतं. जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.  

सिंह (Leo)

आजच्या दिवशी कोणतंही काम करण्यापूर्वी अनेक वेळा विचार केला पाहिजे. लाईफ पार्टनर आणि तुमची मुलं तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करू शकतात.

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी मनातून नकारात्मक विचार काढून टाकणं तुमच्या हिताचं आहे. शुभ कार्यात सहभाग घेतल्याने तुमचा सन्मान वाढेल.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना एखादी चांगली बातमी मिळू शकते. भविष्यासाठी बिझनेस प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी चांगले राहील

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी कौटुंबिक गरजांवर पैसा खर्च करून आनंद मिळेल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी वैवाहिक जीवनात गोडवा येईल. व्यवसायातील वाढत्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी असाल. 

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी रिकामा वेळ वाया घालवू नका. विद्यार्थ्यांचा मानसिक आणि बौद्धिक भार दूर होईल. पैशाशी संबंधित समस्या दूर होतील.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी नात्यात काही तणाव निर्माण झाला तर तो दूर होईल. कुटुंबातील लोक तुमच्या बोलण्याने खूश होतील. 

मीन (Pisces)

आजच्या दिवशी पैशाचे व्यवहार बजेट करून केले तर बरे होईल. कौटुंबिक नात्यात सुरू असलेली दुरावा तुम्ही संवादातून सोडवू शकता. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More