मुंबई : आज लक्ष्मीपूजनाचा सण सगळीकडे साजरा केला जात आहे. आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाते. आज सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ५८ मिनिटांपर्यंत प्रदोषकालात लक्ष्मीपूजन केले जाणार आहे.
यादिवशी घरासमोर रांगोली काढली जाते. याविषयी पुराणात एक कथा आहे. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र फिरते. आणि आपल्या निवासासाठी जागा शोधू लागते. जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रीयता असेल तिथे ती आकर्षित होते.
तसेच ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी,सदाचारी,क्षमाशील माणसे राहतात तेथे वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. चांगल्या मार्गाने मिळवलेल्या आणि चांगल्या मार्गाने खर्च होणाऱ्या पैशालाच 'लक्ष्मी ' म्हणतात.
हिंदू परंपरेनुसार सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीचाच उल्लेख होतो. या सणाच्या निमित्ताने असंख्य दिव्यांनी आंगण घर उजळून निघते म्हणून या सणाला दीपावली असं म्हटलं जातं. लहान थोरांच्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या या सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहात असतो. यांदाची दिवाळी ही १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. १७ तारखेला धनत्रयोदशी तर यम चतुदर्शी १८ ऑक्टोबरला साजरी केली गेली.
लक्ष्मीपूजन १९ ऑक्टोबरला केले जाईल तर २० तारखेला गोवर्धन पूजा केली जाईल. त्यानंतर २१ ऑक्टोबरला देशभरात भाऊबीज साजरी केली जाईल. दिवाळीच्या दिवशी यश, किर्ती आणि धनलाभाची कामना करत महालक्ष्मीची पूजा केली जाते. असे म्हणतात की, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी लक्ष्मीसोबतच भगवान गणेश, विष्णू आणि कुबेराची पूजा करावी.
यंदा दिवाळी १९ ऑक्टोबरला गुरूवारी आली आहे. या दिवशी महालक्ष्मीच्या पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी सायंकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंत असेल. या वेळेत सर्वजण लक्ष्मीचं पूजन आणि विधी करु शकता.