भाऊबीजेकरता फक्त 2 तासांचा मुहूर्त, जाणून घ्या वेळ

फक्त 2 तास 17 मिनिटांचा शुभ मुहूर्त 

भाऊबीजेकरता फक्त 2 तासांचा मुहूर्त, जाणून घ्या वेळ

मुंबई : पाच दिवसांच्या दिपावलीचा आजचा शेवटचा दिवस. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. दिपावलीच्या पाडव्यानंतर भाऊबीज हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी बहिण भावाला औक्षण करून त्याच्या दिर्घायुष्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो. यानंतर बहिण भावाला आणि भाऊ बहिणीला भेट म्हणून देतो. 

भाऊबीज साजरी करण्याचा मुहूर्त ?

भाऊबीज या सणामुळे आता धकाधकीच्या जीवनात एक गेट टू गेदर होऊन जातं. सगळी भावंड एकत्र भेटतात आणि हा सण साजरा करतात. या दिवशी भावाला मनापासून बहिण औक्षण करते. आणि त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करता. अशी आख्यायिका आहे की, या दिवशी यम आपल्या बहिणीकडे म्हणजे यमिकडे जातो. तिच्याकडून औक्षण करून घेतो. म्हणून या दिवशी हा सण साजरा केला जातो. 

शुभ मुहूर्त प्रारंभ - दुपारी 1 वाजून 10 मिनिटे 
शुभ मुहूर्त समाप्त - 3 वाजून 27 मिनिटे 

अशी आख्यायिका 

कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच यमद्वितीयेलाच भाऊबीज म्हटले जाते. या दिवशी भाऊ बहिणीकडे हक्काने जातो. प्रेमाने जातो, औक्षण केल्यावर तिला प्रेमाने भेटवस्तू देतो. मान्यता आहे की, या दिवशी बहिणीच्या घरी भोजन केल्याने भावाचे आयुष्य वाढते.  कार्तिक शुक्ल व्दितीयाच्या दिवशी यमुनाने आपला भाऊ यमला आपल्या घरी बोलवुन सत्कार करुन जेवू घातले. यामुळे या सणाला यम व्दितीया या नावाने देखील ओळखले जाते. तेव्हा यमराजने प्रसन्न होऊन यमुनेला वर दिला कि जो मनुष्य या दिवशी यमुनेत स्नान करुन यमाचे पूजन करेल, त्याला मृत्यूनंतर यमलोकात जावे लागणार नाही. सूर्याची पुत्री यमुना सर्व कष्टांचे निवारण करणारी देवी स्वरुप आहे.