मुंबई : दिवाळीचा तिसरा दिवस अश्विन अमावस्या म्हणजेच लक्ष्मी पूजन... दीपोत्सवात सुख-समृद्धीसाठी घरोघरी आज लक्ष्मीचं पूजन केलं जातं. व्यापारी वर्गातही लक्ष्मीपूजनाचा उत्साह आहे. घरोघरी लक्ष्मीपूजनाचा थाट आज पाहायला मिळेल. व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. चोपड्या, खतावण्या आणि धनाची पूजा करण्यासाठी व्यापारी दोन - दोन दिवसांपासून तयारी करत आहेत.
प्रथेप्रमाणे सायंकाळच्या दरम्यान लक्ष्मीपूजन केलं जातं. परंतु, लक्ष्मीपूजन नेमकं कोणत्या वेळी करावं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं उत्तर दिलंय पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी...
संध्याकाळी ६.०१ ते ८.३५ पर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी म्हटलंय. त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात या दिवसाचं महत्त्व...