Friday Jyotish Remedies: मार्गशीर्ष महिना सुरु झाला असून सर्वात पवित्र महिना असल्याचं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं आहे. हा महिन्यातील पहिला शुक्रवार द्वितीयेला येत आहे. या दिवशी धृतियोग देखील आहे. या दिवशी कोणतंही काम केल्यास फळास येतं. या योगामध्ये एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्या व्यक्तीला यश प्राप्त होते. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला (Mata Laxmi) समर्पित आहे. मान्यतेनुसार या दिवशी विधिवत पूजनासह (Mata Laxmi Puja vidhi) व्रत आणि दान केल्याने शुभ फळ प्राप्त होते. यासह धन संबंधी समस्या दूर होते. शुक्रवार हा शुक्र ग्रहाशी निगडीत वार आहे. शुक्राला धनदाता ग्रह म्हणून ओळखलं जातं. आथिर्क समस्येतून मुक्ती मिळण्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहे.
शुक्रवारी करा हा उपाय
- व्यवसायात वाढ होण्यासाठी चार मुखी रुद्राक्षाची विधिवत पूजा करून धारण करा. यामुळे तुमच्यामध्ये कर्तृत्वाचा संचार होईल आणि व्यवसायात वाढ होईल.
-शुक्रवारी मिठाचे दान केल्याने शुक्र ग्रह संबंधी दोष दूर होतो. त्यामुळे शुक्रवारी गरीब आणि गरजुंना मीठ दान करावे.
- तुमच्या जवळ पैसा टिकत नसेल तर शुक्रवारी मंदिरात कमळाचे फुल, दही, बत्ताशे, कावडी आणि शंख माता लक्ष्मीच्या चरणात अर्पण करावे. माता लक्ष्मीला या वस्तू अतिप्रिय आहेत.
- ज्योतिष शास्त्रानुसार जर तुमच्या बहिणी किंवा मावशीच्या नात्यात कटुता असेल तर जेवणातून भाकरी काढून वेगळी ठेवावी. आणि त्याचे तीन भाग करा. एक भाग कावळ्यांना, एक भाग कुत्र्याला द्या आणि एक भाग गायीला द्या. यामुळे नात्यात पूर्वीप्रमाणे गोडवा येईल.
- घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुरटीचा तुकडा घेऊन घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा. काळा होईपर्यंत तिथेच राहू द्या. नंतर फेकून द्या. शुक्रवारी हे उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
बातमी वाचा- Guru Margi 2022: अखेर गुरू मीन राशीत मार्गस्थ, पाच महिने या राशींसाठी फायद्याचे, नंतर...
- जर तुम्ही शुक्रवारी कोणत्याही शुभ कार्यासाठी घराबाहेर जात असाल तर तुमच्या बहिणीचा किंवा मुलीचा आशीर्वाद घ्या. तसेच, त्यांना काही भेटवस्तू द्या. यामुळे तुमचे काम नक्कीच यशस्वी होईल.
- जीवनसाथीच्या प्रगतीसाठी शुक्रवारी पोपटाला हिरवी मिरची खाऊ घाला. जर हे शक्य नसेल तर पोपटाचे चित्र आणा आणि घराच्या उत्तर दिशेला ठेवा. शुक्रवारी असे केल्याने तुम्हाला लवकर प्रगती होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)