Margashirsha Guruvar Vrat 2023 : मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यातील गुरुवारला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्याएवढ्याच पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत आणि श्री स्वामी समर्थ यांचं व्रत केलं जातं. तुम्ही पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करणार असाल तर 5 चुका नक्की टाळा. त्याशिवाय पहिल्यांदाच गुरुवारचं व्रत करणार असाल तर जाणून पूजा विधीसह सर्व माहिती. (Do Margashirsh Thursdays Then learn these 5 mistakes Mahalakshmi Vrat Pooja rituals vaibhav lakshmi puja ghat sthapana)
यंदा मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवारचे महालक्ष्मी व्रत आले आहेत. पाचव्या गुरुवारी अमावस्या तिथी असली तरी गुरुवार व्रताचं उद्यापन करता येणार आहे.
पहिला गुरुवार - 14 डिसेंबर
दुसरा गुरुवार - 21 डिसेंबर
तिसरा गुरुवार - 28 डिसेंबर
चौथा गुरुवार - 4 जानेवारी
पाचवा गुरुवार - 5 जानेवारी
ज्या ठिकाणी घरात मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढा. त्यानंतर चौरंग किंवा पाट ठेवा. चौरंगावर लाल कपडा परिधान करुन त्यावर तांदूळ घालून त्यावर तांब्याचा कलश स्थापन करा. कलशाला हळद-कुंकु लावून आत दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घाला. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवा. त्यानंतर एक नारळ ठेवा. चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवा. आपण आपल्या इच्छेप्रमाणे आणि शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवा.
(वरील लिंकमध्ये तुम्हाला पूजा विधी व्हिडीओ, घट सजावटीचा व्हिडीओ पाहिला मिळेल)
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करताना तुमच्या काही चुकांमुळे त्या व्रताचं फळं तुम्हाला मिळत नाही.
1 जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करा. मनात सुद्धा वाईट विचार आणू नका.
2 मार्गशीर्ष महिन्यात मासमच्छी आणि मद्यपानाचं सेवन करु नयेत. सात्विक आहार घ्यावा.
3 जेव्हा आपण कुठलं व्रत करत असतो तेव्हा कोणाशीही खोटं बोलू नये आणि कोणालाही फसवू नये. इतरांबद्दल वाईट बोलू नयेत.
4 गुरुवार हे महालक्ष्मीचं व्रत आहे. महालक्ष्मी ज्या घरात सुख शांती असते तिथे वास करते. म्हणून गुरुवारचं व्रत करताना मार्गशीर्ष महिन्यात वादविवाद, भांडण करु नये.
5 घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मान राखा त्यांची सेवा करा. जर तुम्ही ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान आणि सेवा करत नाही तर तुम्हाला व्रताचं फळं मिळत नाही.
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥
जय देवी जय देवी…॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥
जय देवी जय देवी…॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी…॥
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥
जय देवी जय देवी…॥
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥
जय देवी जय देवी…॥
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)