मुंबई : हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रात प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवसासाठी विशेष वेळ, मुहूर्त ठरवून दिला जातो. ज्यामुळे कोणतंही काम करताना ते शुभ मुहूर्तावर केल्याने त्याचे परिणाम अधिक चांगली होतील.
प्रत्येक दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्या आणि करु नयेत यालाही महत्त्व आहे. त्याचे परिणाम कळत नकळत त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. शनिवारी अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी करणं टाळा नाहीतर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.
1. लोखंडापासून तयार करण्यात आलेली कोणतीही गोष्ट खरेदी करणं टाळा
2. लोखंडापासून तयार करण्यात आलेली कोणतीही वस्तू तुम्ही दान करू शकता पण खरेदी करू नका, त्यामुळे शनिदेवाचा कोप होऊ शकतो असं समजलं जातं.
3. या दिवशी चुकूनही तेल खरेदी करू नका. पण तेल तुम्ही दान करू शकता.
4. शनिवारी कधीही मीठ खरेदी करू नये. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा आणि घरात कलह निर्माण होण्याची भीती असते.
5. कात्रीची खरेदी करू नका. त्यामुळे घरात कलह निर्माण होतात.
6. शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ ठेवा. त्यामुळे तुमच्या समस्या दूर होऊ शकतात असं सांगितलं जातं.
7. शनिवारी चप्पल खरेदी करू नये असं म्हणतात, शक्यतो काळ्या रंगाच्या चपला खरेदी करणं टाळा. त्यामुळे कामात अडथळे निर्माण होऊ शकतात.
8. या दिवशी इंधन खरेदी करू नये असं म्हटलं जातं. त्यामुळे घरातील सदस्यांवर मोठं संकट ओढवू शकतं.
9. झाडू ही लक्ष्मीची कृपा असते. त्यामुळे ती शनिवारी खरेदी करू नये. घरात दारिद्र येतं.
10. तुम्हाला वही पेन खरेदी करायचं असेल तर ते शनिवारी खरेदी करू नका. त्याऐवजी गुरुवारी करावं, त्यामुळे आयुष्यात अपयश येत नाही.