Kartik Purnima 2022: लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला करा हे उपाय, आर्थिक अडथळे होणार दूर!

Kartik Purnima 2022: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णु यांची कृपा मिळवण्यासाठी खास दिवस असतो. यंदा 8 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे. मात्र खग्रास चंद्रग्रहण (Chandra Grahan) असल्याने सुर्योदयापासून सकाळी 8 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 नंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय करू शकता. 

Updated: Nov 7, 2022, 05:57 PM IST
Kartik Purnima 2022: लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला करा हे उपाय, आर्थिक अडथळे होणार दूर! title=

Kartik Purnima 2022: कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा (Tripurari Purnima) किंवा त्रिपुरी पौर्णिमा संबोधलं जातं. या दिवशीच भगवान शंकराने (God Shiva) त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता. या आनंदात देवगणांनी दिवाळी साजरी केली होती. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णु यांची कृपा मिळवण्यासाठी खास दिवस असतो. यंदा 8 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे. मात्र खग्रास चंद्रग्रहण (Chandra Grahan) असल्याने सुर्योदयापासून सकाळी 8 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 नंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय करू शकता. 

देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी उपाय

-कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा-यमुना यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करा. सुर्योदयापूर्वी स्नान केल्यास उत्तम राहील. हातात कुशा घेऊन नदीत स्नान करा. यामुळे घरात भरभराट होईल. जीवनात सुख-समृद्धी येईल. नदीवर जाऊन स्नान करता येत नसेल तर घरातील पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा. 

-कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर हळदीने स्वास्तिक काढा. आब्यांच्या पानाचं तोरण लावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात आगमन करते. यामुळे घरात सुख समृद्धी येते. 

-कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी, तलावात दीपदान करा. शक्य नसल्यास मंदिरांमध्ये दीपदान करा. या दिवशी तुळशीजवळ दिवा लावावा. त्याचबरोबर तुळशीच्या मुळाजवळील मातीचा तिलक लावावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल.

Chandra Grahan 2022: 200 वर्षांनंतर चंद्रग्रहणावेळी अशुभ योग, या राशीच्या लोकांनी जरा सांभाळूनच

-कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दूध, तांदूळ आणि साखरे मिसळून अर्घ्य द्या. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि धन-समृद्धी देईल.

-कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवासह पार्वती गणपती आणि कार्तिकेयची पूजा करा. पंचामृत अर्पण करा. यामुळे जीवनातील अडचणी दूर होतील.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)