Chanakya Niti: उत्तम आरोग्यासाठी चाणाक्यांनी सांगितलेले नियम तुम्ही पाळताय?

आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले नियम तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर   

Updated: Oct 26, 2022, 08:10 AM IST
Chanakya Niti: उत्तम आरोग्यासाठी चाणाक्यांनी सांगितलेले नियम तुम्ही पाळताय?  title=

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. आचार्य चाणक्य यांचे नीति धोरणं आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ध्येय धोरणांबाबत कायमच उत्सुकता असते. आचार्य चाणक्य यांच्या मते, उत्तम आरोग्यासाठी काही गोष्टींचं पालन करणं अत्यंत गरजेचं असतं. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात जीवनाच्या प्रत्येक गोष्टींविषयी सांगितलं आहे.  नीतिशास्त्रात लिहिलेल्या गोष्टींचे पालन केल्याने माणसाला यश मिळते. (Chanakya Niti for good life)

आरोग्य ही मानवी जीवनाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर तो कोणत्याही समस्येशी लढू शकतो. त्यामुळेच आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, असे म्हटलं जातं. उत्तम आरोग्य हे आपल्या आहारावर अवलंबून असतं. चला जाणून घेऊया चाणक्य नीतीनुसार निरोगी राहण्यासाठी कोणत्या नियमांचं पालन केले पाहिजे... (Chanakya Niti For Health)

चूर्ण दश गुणो अन्न ते, ता दश गुण पय जान।
पय से अठगुण मांस ते तेहि दशगुण घृत मान॥

चाणक्य नीतिच्या या श्लोकात आचार्यांनी सांगितले आहे की, कच्च्या धान्यापेक्षा जास्त चूर्ण धान्य फायदेशीर आहे. चूर्ण धान्यापेक्षा दूध जास्त फायदे देते. दुधापेक्षा मांस 10 पट अधिक पौष्टिक आहे आणि तूप त्यापेक्षा 10 पट जास्त फायदे देते. (Chanakya Niti For good health)

अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्।
भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्।।

आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, अन्न पचण्यासाठी पाणी (water) औषध. जेवल्यानंतर 1 ते 2 तासांनीच पाणी पिणे फायदेशीर आहे. यासोबत जेवणादरम्यान थोडेसे पाणी पिणे हे अमृतसारखे आहे. पण अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे विष बनते. 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)