Horoscope 26 October 2022 : आज नात्यांवरचंही ग्रहण सरणार; ‘या’ राशींना गोड बातमी मिळणार

मंगळवारी असणारं ग्रहण संपलं आणि आता राशींमध्ये असणारं ग्रहणही सरणार आहे. नात्यांमध्ये असणारा दुरावा मिटणार आहे. जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी असेल भाऊबीज. (Bhai dooj 2022)

Updated: Oct 26, 2022, 06:01 AM IST
Horoscope 26 October 2022 : आज नात्यांवरचंही ग्रहण सरणार; ‘या’ राशींना गोड बातमी मिळणार  title=
Todays horoscope 26 october bhai dooj diwali 2022

Horoscope 26 October 2022 : मंगळवारी असणारं ग्रहण संपलं आणि आता राशींमध्ये असणारं ग्रहणही सरणार आहे. नात्यांमध्ये असणारा दुरावा मिटणार आहे. जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी असेल भाऊबीज. (Bhai dooj 2022)

मेष- आज तुम्हाला नशिबाची साथ आहे. समाज आणि कुटुंबात तुमच्या शब्दाला मान असणार आहे. कौटुंबीक आनंद मिळणार आहे. जोडीदाराशी सुरेख ताळमेळ साधाल.

वृषभ- आज तुम्हाला व्यवहारांवर ताबा ठेवावा लागणार आहे. आज सर्व मतभेद आणि नात्यांमधला दुरावा मिटणार आहे. दुरावलेली माणसं जवळ येणार आहेत.

मिथुन- मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या. आजचा दिवस शुभ आहे. धनलाभ होण्याचा योग आहे. आज मोठ्यांचे आशीर्वाद फळणार आहेत. आजापणांपासून दूर राहाल.

कर्क- कुटुंबाप्रती असणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण होणार आहेत. आजचा दिवस दिलासादायक आहे. व्यापारवृद्धिचा लाभ होणार आहे.

सिंह- आज तुमच्या शब्दाला मान असणार आहे. निर्णय असे घ्या ज्याचे दूरगामी फायदे असतील. आज भावाकडून एखादी अविस्मरणीय भेट मिळणार आहे.

कन्या- आज गोड बातमी मिळणार आहे. आर्थिक वाटांवर प्रगतीचा योग आहे. नव्या नोकरीची संधी आज तुम्ही स्वीकारण्याचा निर्णय घ्याल.

तुळ- जोडीदाराच्या सहाय्यानं आज तुम्ही यशशिखरं गाठणार आहात. आत्मविश्वास बाळगा, सर्व गोष्टी तुमच्या मनाजोग्या घडतील.

वृश्चिक – आज तुमच्याच कलानं गोष्टी घडणार आहेत. बोलण्यावर ताबा ठेवा. अतिउत्साहाला वेसण घाला.

धनु- व्यवसायाच्या दृष्टीनं एखादा मोठा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय घ्याल. नातेसंबंध सुधारणार आहेत.

मकर- आज एक अविस्मरणीय भेट मिळणार आहे. तुमच्यामागे असणाऱ्या नकारात्मक शक्तींचा ऱ्हास होणार आहे.

कुंभ- बहुप्रतिक्षित कामं मार्गी लागणार आहेत. सामाजिक स्तर वाढलेला असेल. आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळेल.

मीन- अडकलेले व्यवहार मार्गी लागणार आहेत. मोठ्यांचे सल्ले घ्या, प्रत्येक कामात यश मिळेल. जोडीदाराची साथ मिळेल.