मुंबई ; उद्या १४ जानेवारी म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी तुमच्या राशीनुसार दान करणे नक्कीच लाभदायी ठरेल. पहा कोणत्या राशीने काय दान करावे...
मेष राशीसाठी ही मकर संक्रांत अत्यंत शुभ आहे. वाहनांचे स्वप्न साकार होईल. व्यवसायात विस्तार आणि लाभ होण्याची शक्यता आहे. मेष रास असणाऱ्यांनी मच्छरदानी, तीळ दान करावे.
नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. वाद-विवाद मिटतील. या राशीच्या लोकांनी वस्त्र किंवा धान्याचे दान करावे.
स्वास्थ्य सांभाळा. ब्लॉंकेट, तिळाचे लाडू दान करा.
विरोधकांपासून सावध रहा. थकलेली कामे मार्गी लागतील. मकर संक्रांतीला साबुदाणे, मध यांचे दान करा.
काही वाद असल्यास त्यावर तोडगा निघेल. संपत्तीत वृद्धी होईल. चण्याची डाळ. तूप दान करा.
जुनी इच्छा पूर्ण होईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. व्यवसायात देखील लाभ होईल. चादर, गरम कपडे दान केल्याने अशुभतेचे सावट कमी होईल.
मान-सन्मान वाढेल. मेहनत घेतल्यास आर्थिक लाभ नक्कीच होईल. गुळ, तिळाचे तेल किंवा तांदूळ दान करा.
मतभेदांपासून दूर रहा. दूध, दही आणि तीळाचे पदार्थ दान करणे उत्तम ठरेल.
नोकरीत वरिष्ठ त्रास देऊ शकतात. चण्याची डाळ पिवळ्या रंगाच्या गाईला खायला घाला किंवा हळदीचे दान करा.
या राशीसाठी संक्रांत शुभ असेल. त्याचबरोबर परदेश गमनाचा योग देखील संभवतो. सूर्याला पाणी द्या. उडदाची डाळ, राई दान करा.
नोकरीत सन्मान वाढेल आणि व्यवसायात धन वाढेल. गरीबांना ब्लॉंकेट, काळे तीळ आणि तेलाचे दान केल्याने अवश्य फायदा होईल.
आर्थिकदृष्ट्या फायदा होईल. विरोधक दबावाखाली राहतील. गहू, गुळ आणि ब्लॉंकेट दान करणे श्रेष्ठ ठरेल.