Gudi Padwa 2024: गुढीपाडव्यापासून ‘या’ राशींची भरभराट होणार; नववर्षापासून पालटणार नशीब

Lucky zodiac signs on New Year: नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच काही राशींना विशेष लाभ मिळणार असल्याचं मानलं जाते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ होणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Apr 6, 2024, 04:52 PM IST
Gudi Padwa 2024: गुढीपाडव्यापासून ‘या’ राशींची भरभराट होणार; नववर्षापासून पालटणार नशीब title=

Lucky zodiac signs on New Year: हिंदू नववर्ष गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा तिथीपासून सुरू होणार आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार ते यंदा 9 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. या महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीमुळेच त्याला वैशिष्ट्य प्राप्त होतं. याच नवरात्रीच्या सुरुवातीलाच हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा सण साजरा केला जातो. 

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच काही राशींना विशेष लाभ मिळणार असल्याचं मानलं जाते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ होणार आहे.

वृषभ रास

हिंदू नववर्षाच्या निमित्ताने वृषभ राशीच्या लोकांना जीवनात विशेष लाभ मिळू शकतो. तुम्ही पगार वाढीसाठी पात्र असाल, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. जुन्या गुंतवणुकीतूनही तुम्हाला लाभ मिळू शकतो. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. एखाद्या आजारामुळे चिंतेत असाल तर तो आजार बरा होईल आणि तुमचं आरोग्य सुधारेल.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाचा काळ चांगला मानला जातो. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होईल. तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुमच्यासाठी कार खरेदीचे खास योग आहेत. नवीन वर्षाची ही वेळ तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले परिणाम देऊ शकते. तुम्हाला खास भेट मिळेल. नोकरदार व्यक्तींसाठी हा कालावधी चांगला आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांना या वर्षी खूप फायदा होईल. तुमचे खर्च कमी होतील आणि संपत्ती वाढेल. कर्जातून मुक्ती मिळेल. तसंच तुम्हाला तणाव इत्यादीपासून आराम मिळू शकतो. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांनाही चांगल्या संधी मिळतील. या नवीन वर्षात आपली सर्व अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. नवीन गाडी किंवा मालमत्ता खरेदीचा योग आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )