Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंती : करा हे सोपे उपाय, मिळेल प्रमोशन, चिंता दूर होईल

Ganesh Jayanti 2023: माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला आज गणेश जयंती आहे. या महिन्यातील बाप्पाच्या जयंतीला माघी गणेश जयंती म्हणतात. विघ्नहर्ता श्री गणेशाच्या भक्तांसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Updated: Jan 25, 2023, 10:21 AM IST
Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंती : करा हे सोपे उपाय, मिळेल प्रमोशन, चिंता दूर होईल title=
Ganesh Jayanti Upay

Ganesh Jayanti Upay: वर्षांतील 365 दिवसांत कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर प्रथम पूज्य बाप्पाचे नाव घेऊन त्याची पूजा करावी आणि कामाला सुरुवात केली पाहिजे. कारण श्रीगणेशाची आराधना केल्याने त्याचे आशीर्वाद प्राप्त मिळतात. त्यामुळे तुमचे कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते. गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. आज गणेश जयंती आहे आणि या दिवशी गणेश पूजेचे मोठे फळ मिळते.

गणेश जयंतीला बाप्पाचा मिळेल आशीर्वाद

गणेश जयंतीला गणेशाची विधिवत पूजा करणाऱ्या भक्तांचे प्रत्येक संकटातून रक्षण होते, अशी श्रध्दा आहे. आज श्रीगणेशाला प्रसन्न केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल. शास्त्रात बुधवारचा दिवस गणपतीला समर्पित मानला जातो. या दिवशी तुम्ही तुमचे कर्ज, आजार, घरगुती वाद आणि नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी गणेशाशी संबंधित काही उपाय करु शकता.  गणेश जयंतीनिमित्ताने बप्पाला या 5 वस्तूंचा भोग चढवा, उघडेल प्रगतीचे दरवाजे

गणेश जयंतीला करा हे उपाय (Ganesh Jayanti Upay)

1. गणपतीला लाडू (मोदक) खूप प्रिय आहेत. या दिवशी त्याला लाडूंसोबत दुर्वा अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात, असे मानले जाते. बाप्पा प्रसन्न झाला तर त्या भक्तावर प्रत्येक देवतेच्या आशीर्वादांचा वर्षाव सुरू होतो. यासोबतच सुख-समृद्धी म्हणजे धन, किर्ती आणि समृद्धी तुमच्या घरात नांदते.

2. गणपतीची कृपा मिळविण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी तांदळात मिसळलेली हिरवी मूग डाळ दान करा. शक्य असल्यास गणेश जयंतीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला. ज्योतिष शास्त्रानुसार या उपायाने गणेशजी नक्कीच प्रसन्न होतात आणि त्रासलेल्या व्यक्तीची कर्जातून लवकरच मुक्तता होते.

3. कलियुगात दानाचे खूप महत्त्व आहे, म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी हिरव्या वस्तूंचे दान करावे. असे सांगितले जाते की बुध ग्रहाची स्थिती शुभ होते आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

4. गणेश जयंतीच्या दिवशी अन्न, वस्त्र आणि धान्य एखाद्या गरीब किंवा योग्य व्यक्तीला म्हणजेच गरजू व्यक्तीला दान करावे. ज्योतिषी मानतात की हे उपाय केल्याने तुमच्या करिअरमध्ये म्हणजेच नोकरी आणि व्यवसायात (तुम्ही जे काही करत आहात) प्रगती साधते. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा पगारवाढीसोबत प्रमोशन मिळते. आणि जर तुम्ही व्यवसाय केलात तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त आशीर्वाद मिळू लागतात.

या राशींवर गणपतीची कृपा

तर जाणून घ्या गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने तुम्हाला चांगले फळ मिळेल.  गणेश जयंतीच्या दिवशी काही राशींवर गणेशाची कृपा होते. आजच्या शुभ मुहूर्तावर वृषभ, कर्क आणि कन्या राशीच्या लोकांवर विशेष आशीर्वादांचा वर्षाव होईल. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)